श्री समर्थ अवधुत महाराज समाधी मंदिराचा कलशारोहण वर्धापनदिन सोहळा २० मे रोजी.
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे येथील श्री समर्थ अवधुत महाराज यांच्या समाधी मंदिराचा कलशारोहण तृतीय वर्धापनदिन सोहळा २० मे रोजी आयोजित केलेला आहे.
सकाळी ९:०० ते ११:०० वा. धार्मिक विधी, दुपारी १२.०० वा. महाआरती, दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद, सायं. ७.०० ते ९.०० वा. भजन, रात्रौ ९.३० वा. वालावलकर दशावतार कंपनीचा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे.
ज्या भाविकांना अन्नदान करायचे असल्यास श्री. महेश राजाराम बागवे 9420206951, श्री. समीर सावंत 8928696083 येथे संपर्क साधावा असे आवाहन मसुरे देऊळवाडा ग्रामस्थ, व अवधुत महाराज भक्तजन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)