बिळवस श्री सातेरी जलमंदिर येथे २० मे पासून शतचंडी यज्ञ!
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे गावची मुळमाया बिळवस येथील श्री सातेरी जलमंदिर येथे सद्गुरू श्री समर्थ साटम महाराज सेवाश्रम मुंबई व सातेरी देवालय ट्रस्ट बिळवस यांच्या वतीने २० ते २२ मे या कालावधीत शतचंडी यज्ञ आयोजित करण्यात आला आहे.
२० मे रोजी स. ७:०० ते ८:३० वा. प्रायश्चित्त, संकल्प, मुख्य संकल्प, गोप्रदान, गणयती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राध्द, आचार्य वर्ण, ग्रम्हण मधुपर्क पुजन, स. ९:०० वा. मुख्य देवता स्थापना, पुजन.स. १०:०० ते दु. १:०० वा. सप्तशती ३० पाठ वाचन, सुवासिनी व कुमारीका पुजन, दु. १:१५ वा. महाप्रसाद, दु. ३:०० ते संध्या. ५:०० वा. सप्तशती २० पाठवाचन, संध्या. ५:३० ते ६:०० वा. आरती, मंत्रयुष्य, दिनसमाप्ती.
२१ मे रोजी स. ७:३० वा. मुख्य देवता व स्थापित देवता षोडशोपचार पुजन, स. ८:३० ते दु. १:३० वा. सप्तशती पाठवाचन ५० पाठ, सुवासिनी व कुमारीका पुजन. दिन समाप्ती. दु. १:३० वा. महाप्रसाद. २२ मे रोजी
स. ७:३० वा. मुख्य देवता स्थापित देवता षोडशोपचार पुजन, अग्निस्थापना, नवग्रह मंडल स्थापना व पूजन, नवग्रह मंडल व वास्तु मंडल देवता हवन, १०:०० ते दु. १२:३० वा. सप्तशती १० पाठ हृवन, पिठस्थ देवला, आवरण देवता स. हवन, सुवासिनी व कुमारीका पुजन. श्री. काशीनाथ य. किनी दु. १२:३० वा. बलिदान व पुर्णाहुती, तर्पण, मार्जन,दु. १:०० वा. यजमान अभिषेक, नवग्रह, उत्तरपुजा मुख्यदेवता पंचोपचार पुजन कुष्मांड, श्रीमती. मंगला व. परब बलीप्रदान. दु. १:३० वा. प्रार्थना, दु.२:०० वा. महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)