टेबल टेनिस खेळाडू अंशिता ताम्हणकर हिचा राज्यपालांच्या हस्ते गौरव.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साळीस्ते (तालुका कणकवली) येथील असलेली अंशिता अशोक ताम्हणकर हिचा मुंबई येथे कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अंशिता अशोक ताम्हणकर ही मुंबई मधील बेस्ट टेबल टेनिस खेळाडू असून मुंबईचे कर्णधार पद भूषविले आहे. मुंबई येथे नुकताच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ३५ वा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अंशिता हिच्या टेबल टेनिस खेळातील कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. यापूर्वी तिने कमी वयात अनेक राज्यस्तरीय स्पर्धा गाजविल्या असून आपल्या लक्षवेधी खेळाने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सध्या ती परेश मुरेकर यांच्याकडे खेळाचे प्रशिक्षण घेत आहे आणि यापूर्वी अनेक स्पर्धा तिने आपल्या उत्कृष्ट खेळाने गाजवल्या आहेत. अनेक स्पर्धांमध्ये तिने भरघोस पदकांची कमाई केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचा ॲथलीट कु. सोहम चव्हाण याची विभागीय स्पर्धेच्या पात्रतेची 'उंच उडी...!'