अद्वैत फाऊंडेशनच्या वतीने आयोजित गोपुरीत व्यक्तिमत्व विकास शिबीर.
अक्षता कांबळी यांची विशेष उपस्थिती.
सरिता पवार व राजन चव्हाण यांच्या उपक्रमाचे दहावे वर्ष.
कणकवली | ब्यूरो न्यूज : अद्वैत फाउंडेशन, कणकवली आयोजित राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्त्व विकास शिबीराला अभिनेत्री व समाजसेविका अक्षता कांबळी विशेष उपस्थित होत्या.
गेली दहा वर्षे सातत्याने शिक्षिका असलेल्या कवयित्री सरिता पवार व पत्रकार राजन चव्हाण हे राष्ट्रसेवा दल व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करत आहेत.
याबद्दल बोलताना अक्षता कांबळी म्हणाल्या की, मागील दहा वर्षात जी मुलं शिकून गेली त्यांना भविष्यात या शिबिराचा खूप फायदा होईल यात शंका नाही.
सरिता पवार व राजन चव्हाण आणि उपस्थित शिबिरार्थींच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी सदिच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)