४० पट नजराणा आकारणीची तरतूद वगळण्यात आल्याबाबत विशेष मोहिम.
४० पट नजराणा आकारणीची तरतूद वगळण्यात आल्याबाबत विशेष मोहिम.
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : कुडाळ तालुक्यातील सर्व संबंधित नागरिक, जमीनधारक, कुळ व लाभार्थी यांच्यासाठी, 'महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, २०२६ ' अन्वये 'महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ चे कलम ४३ च्या पोटकलम (१)' मधील दुसऱ्या परंतु काखालील खंड (क), हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९५० चे कलम ५०-ब मधील पोटकलम (१) मधील परंतु काखालील खंड (क) तसेच महाराष्ट्र कुळवहिवाट (विदर्भ प्रदेश) अधिनियम, १९५८ चे कलम ५७ मधील पोटकलम (१) मधील परंतु काखालील खंड (क) वगळण्यात आलेले आहेत.
त्यामुळे, कायद्यांतील तरतुदींनुसार कुळ कायद्यांतर्गत जमीन प्राप्त झाल्यानंतर विहित १० वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित जमिनीच्या हस्तांतरणास / व्यवहारास परवानगी देताना महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा आकारण्याची तरतूद यापुढे लागू राहणार नाही.
या अनुषंगाने, जिल्ह्यात कुळवहिवाट व शेतजमीन कायद्याच्या तरतुदींन्वये प्राप्त झालेल्या जमिनींबाबत प्रलंबित प्रकरणे तसेच पात्र प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
या विशेष मोहिमेअंतर्गत संबंधित जमीनधारक / कुळ/ लाभार्थी यांनी त्यांच्या जमिनीबाबतची आवश्यक कागदपत्रे व अर्ज तहसील कार्यालय कुडाळ यांचे कार्यालयात सादर करून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व संबंधित महसूल अधिकारी/कर्मचारी यांनी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, २०२६ मधील सुधारित तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व पात्र प्रकरणांमध्ये ४० पट नजराणा आकारणी करू नये, याची दक्षता घ्यावी.
सदर विशेष मोहिमेचा सर्व संबंधित नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)