ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात.

कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात.


उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांचे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियान आणि 'रस्ता सुरक्षा जनजागृती' अंतर्गत आयोजन.

Article image


मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचा उद्देश भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरील ‘हर घर तिरंगा’ अभियान आणि रस्ता सुरक्षा जनजागृती या दोहोंना केंद्रस्थानी ठेवून करण्यात आला. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे होते.


यावेळी चालक - मालक, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी, विविध अभिकरणांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. विजय काळे यांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान, तिरंग्याचे पावित्र्य आणि राष्ट्राभिमान जपण्याबरोबरच रस्त्यावर वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची राष्ट्रीय व सामाजिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोटार वाहन निरीक्षक वसंत कलंबरकर यांनी केले. आपल्या प्रभावी मनोगतात त्यांनी स्वातंत्र्य दिन, राष्ट्राभिमान आणि रस्ता सुरक्षा यांचा उचित् मेळ घालत उपस्थितांमध्ये जनजागृती केली. 


ही जनजागृती रॅली एस.टी. स्टँड → पोलीस स्टेशन → कुडाळ स्कूल → तहसील कार्यालय → एस. एन. देसाई चौक → आर. एस. एन. हॉटेल मार्गे एस. टी. डेपो ग्राउंड येथे पोहोचून तिची सांगता करण्यात आली.


कार्यक्रमाच्या समारोपाला, उपस्थित नागरिकांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रस्ता सुरक्षा शपथ देण्यात आली. नागरिकांसाठी स्वयंस्फूर्तीने अल्पोपहार व फलाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. श्री. प्रकाश गावडे, श्री. अनंता शेळके श्री. शैलेश काळप यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.


यावेळी उपस्थित नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, सुरक्षित वाहनचालकाची जबाबदारी, अपघात टाळण्यासाठी आवश्यक दक्षता आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान याबाबत आवाहन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मोटार वाहन निरीक्षक सूरज कुमार जाधव, संकेत सोमणाचे, योगेश खैरनार, पराग मातोंडकर, अमित नाईकवाडे, अमित पाटील, सिद्धार्थ ओव्हाळ, श्री. लडगे, पद्माकर माने, मितेश माने तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. बाबू तळेकर, उमेश हळदकर, संतोष धुमाळे व अभय सामंत तसेच अनेक सन्माननीय स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स