ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुडाळ शहरातील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुडाळ शहरातील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने.

वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुडाळ शहरातील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने. 


मालवण - कुडाळ मार्गावरील अवजड वाहतूक नेरूर जकात नाका – छत्रपती शिवाजी महाराज चौक (एमआयडीसी) – हॉटेल अन्नपूर्णा – विनायक सुझुकी शोरूम – हॉटेल सदिच्छा – एस. एन. देसाई चौक – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ अशा मार्गाने.


कुडाळ : कुडाळ शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ अन्वये पुढील आदेश होईपर्यंत कुडाळ शहरात येणाऱ्या अवजड वाहतुकीस प्रतिबंध करण्याचे आदेश दिले आहेत.


कुडाळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून येथील बाजारपेठ जिल्ह्यातील प्रमुख व जुनी बाजारपेठ आहे. शहरात मोठी रुग्णालये, उच्च शिक्षणाच्या संस्था तसेच कुडाळ रेल्वे स्थानक असल्याने नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि पर्यटकांची मोठी वर्दळ असते. त्यातच कुडाळ तालुक्यातील एमआयडीसीमध्ये ३५० हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. तसेच मालवण तालुक्यातील खाणींमधून चिऱ्यांची वाहतूक कोल्हापूर, गोवा आणि कर्नाटकच्या दिशेने कुडाळमार्गे होत असल्याने अवजड वाहनांची संख्या मोठी आहे.


कुडाळ शहरातील मुख्य रस्ते अरुंद असून वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने अवजड वाहनांची वाहतूक बाजारपेठेतून होत असताना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. बाजारपेठेतील रस्त्यांवर किरकोळ व्यापाऱ्यांची दुकाने असल्यानेही वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी नागरिक, रुग्ण आणि प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.


दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत कुडाळ शहरातील अवजड वाहतूक मुख्य बाजारपेठेतून न आणता पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय घेण्यात आला.



कुडाळ शहरातील सर्व प्रकारची अवजड वाहतूक बाजारपेठेतून न आणता एसआरएम कॉलेज येथून एमआयडीसीमार्गे मालवण व वेंगुर्ला या दिशेने वळविण्यात आली आहे.


मालवण - कुडाळ मार्गावरील अवजड वाहतूक नेरूर जकात नाका – छत्रपती शिवाजी महाराज चौक (एमआयडीसी) – हॉटेल अन्नपूर्णा – विनायक सुझुकी शोरूम – हॉटेल सदिच्छा – एस. एन. देसाई चौक – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ या मार्गाने वळविण्यात आली आहे.



या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहेत. बंद करण्यात आलेले रस्ते तसेच पर्यायी मार्ग नागरिकांना स्पष्टपणे समजावेत यासाठी आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक व वाहतूक संकेतचिन्हे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी किंवा अपघात होणार नाही, याची दक्षता घेऊन वाहतुकीचे योग्य नियमन करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

      

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स