ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
पेंडूर येथील प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन उत्साहात.

पेंडूर येथील प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन उत्साहात.

प्रकाशन: 10 May 2025 11:19 AM
वाचन संख्या 96

शाळेसाठी काहीतरी करावं’ उद्देशाने आयोजित कार्यक्रम.

वेंगुर्ले | ब्यूरो न्यूज : श्री कुलदेव विद्या मंदिर, पेंढऱ्याची वाडी, पेंडूर या प्राथमिक शाळेत ४ मे रोजी २००३ सालच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, राज्यगीत आणि ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेने झाली. दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि शारदा मातेचे पूजन करण्यात आले. गावचे सरपंच व माजी विद्यार्थी संतोष गावडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांचे तसेच आजी – माजी शिक्षक व पाहुण्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, गुरुजनांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी विद्यार्थी नवनाथ राऊळ, निलेश रेडकर, आप्पा गावडे आणि वीणा गावडे यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाची संकल्पना माजी विद्यार्थी आप्पा गावडे यांनी ‘शाळेसाठी काहीतरी करावं’ या उद्देशाने केली व त्यांना माजी विद्यार्थ्यांनी पाठिंबा देत सहकार्याने आयोजन केले.

यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला लेझीम, वाद्य संच, फॅन, निवेदन स्टँड अशा भेटवस्तू दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केतन गावडे तर निवेदन स्मिता गावडे यांनी केले.

या कार्यक्रमाला, मुख्याध्यापक देवयानी आजगावकर यांचे नेतृत्व व मार्गदर्शन लाभले तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा गौरी फटनाईक, उपाध्यक्ष श्री. नंदकिशोर चव्हाण आणि श्री. मिलिंद गावडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी श्री. बाबुराव गवंडे, श्री. सुरेश राऊळ (उभयता), श्री. सिद्धे गुरूजी, मिलन सांगेलकर, काजल जोशी, श्री. सीताराम लांबर, श्री. चिले गुरुजी, श्री. बालकृष्ण गोसावी तसेच विद्यमान शिक्षक श्री. काळोजी सर, श्री. तेंडोलकर सर, बिर्जे सर, शेळके सर, निवृत्त मुख्याध्यापक श्री. भाऊ आजगावकर, देवयानी आजगावकर आदी शिक्षक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स