ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मठबुद्रुक लोहारवाडी येथील विद्यमान ग्रा. पं. सदस्य, सदस्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश.

मठबुद्रुक लोहारवाडी येथील विद्यमान ग्रा. पं. सदस्य, सदस्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश.

प्रकाशन: 06 May 2025 05:06 PM
वाचन संख्या 42

आ. राणे यांच्या माध्यमातून विकासाचा विश्वास असल्याची प्रवेशकर्त्यांची प्रतिक्रिया.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची उपस्थिती.

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मठबुद्रुक लोहारवाडी येथील विद्यमान ग्रा. पं. सदस्य, सदस्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार राणे यांच्या माध्यमातून विकास शक्य आहे अशा विश्वासातून अनेकांनी हा पक्षप्रवेश केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

शिवसेना आमदार राणे यांच्या अभ्यासू आणि कणखर नेतृत्वाखाली मालवण कुडाळ मध्ये विकास कामांची गंगा वाहत आहे. गावात आणि प्रभागात अधिक गतिमान विकास आमदार राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो याच विश्वासाने आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया प्रवेश कर्त्यांनी दिली.

यावेळी अनंत पानवलकर, अनिता बेनकर या ग्रामपंचायत सदस्यांसह भास्कर बेनकर, सागर बेनकर, गणेश बेनकर, रुपाली बेनकर, सत्यवान भुते, संजय बेनकर, सुमती पानवलकर, अतुल पानवलकर, ममता पानवलकर, सुशांत घाडी, शुभांगी घाडी, सुनीता बेनकर, वसंत बेनकर, प्रकाश बेनकर, विरेश घाडी, निधी घाडी, अरुण भुते, शुभांगी शेमडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सरपंच बाळा वेंगुर्लेकर, उपसरपंच विनायक बाईत, मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर, बाईत यांसह शिवसेना पदाधिकारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स