श्री देवी घुमडाई देवीचा १४ वा वर्धापन दिन.
५ मे ते ८ मे कालावधीत संपन्न होणार सोहळा.
भाविकांच्या उपस्थितीचे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दत्ता सामंत यांचे आवाहन.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिराचा १४ वा वर्धापन दिन सोहळा ५ मे ते ८ मे या कालावधीमध्ये साजरा होत आहे. या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सोमवार दि. ५ मे रोजी सायंकाळी ७ वा. सुश्राव्य भजन, रात्री ९ वा. स्थानिक कलाकारांचे विविध करमणुकीचे कार्यक्रम, रेकॉर्ड डान्स, एकपात्री प्रवेश एकांकिका होणार आहे.
मंगळवार दि. ६ मे रोजी सायंकाळी ७ वा. सुश्राव्य भजन, रात्री ९ वा. स्थानिक कलाकारांचे विविध करमणुकीचे कार्यक्रम, रेकॉर्ड डान्स, एकपात्री प्रवेश एकांकिका होणार आहे. बुधवार दि. ७ मे रोजी सायंकाळी ७ वा. सुश्राव्य भजन, रात्री ९ वा. प्रभाकर पार्सेकर प्रस्तुत पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘भैरी भवानी’ हा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे.
गुरुवार दि. ८ मे रोजी सकाळी ९ वा. वर्धापनदिन सोहळा, देवीचे पूजन, सकाळी १० वा. सत्यनारायण महापूजा, सकाळी ११ वा. “स्वरब्रम्ह” मालवण प्रस्तुत गायनाचा कार्यक्रम (गायक- दिलीप ठाकूर, ऑर्गन- बुवा श्री. भालचंद्र केळुसकर, पखवाज- विशाल केळुसकर, तबला- प्रसाद मेसी), दुपारी १२ वा. पालखी सोहळा, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. सुश्राव्य भजन, रात्री ९ वा. चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळ प्रस्तुत सेलिब्रिटी कलाकारांचा डान्स जलवा २०२५ असे कार्यक्रम होणार आहेत.
भाविकांनी या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)