ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
१२ वी परीक्षेत मालवण तालुक्याचा निकाल ९९.३६ टक्के.

१२ वी परीक्षेत मालवण तालुक्याचा निकाल ९९.३६ टक्के.

प्रकाशन: 06 May 2025 11:37 AM
वाचन संख्या 62

मालवण | ब्यूरो न्यूज : फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात मालवण तालुक्याचा निकाल ९९.३६ टक्के लागला आहे. या परीक्षेत कट्टा येथील वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा सोहम लाड ९४.६७ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात तृतीय आला आहे. याच प्रशालेचा हर्षवर्धन पाटील हा ९२ टक्के गुण मिळवून तालुक्यात द्वितीय तर टोपीवाला हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी निकिता ताम्हाणेकर ही ९१ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे.

बारावी परीक्षेत येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा निकाल ९५.३८ टक्के लागला आहे. टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.२० टक्के लागला आहे. वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आर्ट्स आचराचा निकाल शंभर टक्के लागला आहे. भंडारी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सौ. इ. द. वर्दम कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कै. सौ. जयश्री वामन प्रभू आर्ट्स आणि कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालय काळसेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. टोपीवाला हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचा व्होकेशनल शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. आर. पी. बागवे हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय मसुरेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

महाविद्यालय निहाय निकाल पुढीलप्रमाणे टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय कला – काजल लुडबे (८१.३३ टक्के), तुलसी सकपाळ (७७.८३ टक्के), तन्वी पराडकर (७७ टक्के), रीना बुटे (७४.५० टक्के), तनया परब (७०.८३ टक्के), वाणिज्य – यशश्री पवार (८८ टक्के), युक्ता सावंत (८६ टक्के), जान्हवी आंबेरकर (८४.८३ टक्के), शुभम गावडे (८४.८३ टक्के), ऐश्वर्या पराडकर (८४.६७ टक्के), विज्ञान धनश्री शेटवे (८७ टक्के), वैभवी मेस्त्री (८७ टक्के), हितेश मालंडकर (८३.५० टक्के), अथर्व कदम (८०.१७ टक्के), प्रणव चव्हाण (७८.३३ टक्के), मॅकनील फर्नांडिस (७८ टक्के).

व्होकेशनल – दर्शना खरवते (६८.१७टक्के), नरहरी कोळंबकर (६२.८३ टक्के), ज्योती सादये (६० टक्के), पीयूष मालाडकर (५९.१७ टक्के), तन्वी चिंदरकर (५७.३३ टक्के) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुदेश मयेकर, सचिव विजय कामत, मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य – सिद्धी परब (८५.१७ टक्के), कला कोमल दहीतुले (७१ टक्के), जान्हवी माळी (६५.३३ टक्के), युगाली घोगळे (५५.३३ टक्के) यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, आनंद वराडकर, शेखर पेणकर, सुनील नाईक, विजयश्री देसाई, साबाजी गावडे, अन्य संचालक, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष अनिल फणसेकर, मुख्याध्यापिका देवयानी गावडे अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरण वाणिज्य यश सावंत (७६.१७टक्के), सोहम कासले (७२.८३ टक्के), सायली चव्हाण (७१.८३ टक्के), कला – आविश शेमडकर (३१० गुण), सिद्धी काजरेकर (२८३ गुण), प्रियांका मोडक (२६५ गुण) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अनिल कांदळकर, सचिव विलास माधव, गोपीनाथ पालव, सर्व संचालक, प्राचार्य श्री. कुंभार, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

स्व. सौ. जयश्री वामन प्रभू कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय काळसे वाणिज्य मैथिली प्रभू (८३.३३ टक्के), प्रणिता खोत (७७.८३ टक्के), नविता माडये (७६.१७ टक्के) यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

एम. जी. बागवे भरतगड उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालय मसुरे इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी – चैताली गुरव (५१.१७ टक्के), चिन्मयी गुरव (५०.३३ टक्के), इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी – कल्पेश माळकर (७० टक्के), एकनाथ परब (६९.८३ टक्के), संकेत चव्हाण (६३.८३ टक्के) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ. दीपक परब, प्रसाद बागवे, स्थानिक समिती अध्यक्ष राजन परब, शाळा समिती अध्यक्ष सरोज परब, मुख्याध्यापिका अर्चना कोदे, महेश बागवे, संस्था सभासद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा विज्ञान – दीक्षा ठोंबरे (८४.६७ टक्के), रोहिणी परुळेकर (८४.५० टक्के), पूर्वा परुळेकर (७८.३३ टक्के), युतिका पालव (७८.३३ टक्के), कृष्णा देसाई (७८.३३ टक्के) यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, आनंद वराडकर, शेखर पेणकर, सुनील नाईक, विजयश्री देसाई, साबाजी गावडे, संचालक शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष अनिल फणसेकर, मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक यांनी अभिनंदन केले आहे.

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य- सानिका नरे (७७.७६ टक्के), आर्या किडये (७५.३३ टक्के), रिया सावंत (७१.५० टक्के), कला वायदा खान (७९.५० टक्के), भार्गव खरवते (७२ टक्के), तन्वी दुखंडे (६४.६७ टक्के) यशस्वी विद्यार्थ्यांचे कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, चंद्रशेखर कुशे, शालेय समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण अन्य संस्था पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. ए. ठाकूर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाच विज्ञान -ईशा शिरोडकर (३६२ गुण), भाग्यश्री सावंत (३५२ गुण), तनिषा वायंगणकर (३५२ गुण), संजू चकलिया (३४५ गुण), वाणिज्य गौरी भोगले (४९९ गुण), संजना हरकुळकर (४६२ गुण), हर्ष चव्हाण (४५५ गुण), कला प्रणया मांजरेकर (५०३ गुण), पूर्वा कोरगांवकर (३९६ गुण), हर्षद पाटकर (३५४ गुण) यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, जॉन नरोना, प्राचार्य हणमंत तिवले यांच्यासह संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स