ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदिवडे येथील श्री महालक्ष्मी मंदिराचा ७ मे पासून जीर्णोध्दार उ‌द्घाटन सोहळा.

बांदिवडे येथील श्री महालक्ष्मी मंदिराचा ७ मे पासून जीर्णोध्दार उ‌द्घाटन सोहळा.

प्रकाशन: 04 May 2025 12:49 PM
वाचन संख्या 44

मसुरे | प्रतिनिधी : येथील श्री देवी महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोध्दार करुन त्याचा उ‌द्घाटन सोहळा ७ मे ते ९ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. ६ मे रोजी सकाळी ८:३० ते ११:३० देवीचे पाषाण व कलश मिरवणूक (त्रिवेणी संगम – – मळावाडी ते महालक्ष्मी मंदिरपर्यंत), ७ मे रोजी सकाळी ८:३० ते १:३० विधीवत पूजाअर्चा, वास्तुशांती, होमहवन, दुपारी १:३० ते ३ महाप्रसाद, सायं. ७ ते ९ स्थानिक भजने, रात्रौ ९ ते १० संगीत गायन – कु. भूमी आशिष नाबर (आदर्श संगीत विद्यालय, मालवण), रात्रौ १० ते ११.३० सांस्कृतिक कार्यक्रम खोरवाडी महिला मंडळ.

८ मे रोजी सकाळी ८ ते १.३० विधीवत पूजाअर्चा, निशाण फेरी, कलशारोहण, सकाळी १० ते ११ अल्पोपहार, दुपारी १.३० ते ३ महाप्रसाद, सायं. ६ ते ८ संगीत भजने, ७.३० ते ८ दिपोत्सव, रात्रौ ८ ते ९ दिंडी कार्यक्रम (पावणाई भगवती दिंडीपथक), रात्रौ ९ ते १० रेकॉर्ड डान्स, रात्रौ १० वा. नवज्योत कला, क्रीडा नाट्यमंडळ, हिवाळे आयोजित धम्माल मालवणी एकांकिका ‘उच्चाटन’.

९ मे रोजी सकाळी ८ ते १:३० विधीवत पूजाअर्चा, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, महाआरती, दुपारी १:३० ते ३ वा. महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ वा. हळदीकुंकू समारंभ, ७ ते ८ स्थानिक भजने, रात्रौ ८ ते १० वा. खास महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, खेळ पैठणीचा खास आकर्षण मालवणी निवेदक श्री. बादल चौधरी, रात्रौ १० ते १०:३० वा. सत्कार समारंभ, रात्रौ १०.३० वा. एकांकिका ‘वत्सलाहरण’ ‘एकाच पेल्यात’. उपस्थितीचे आवाहन देवस्थान, यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स