श्री देवी सातेरी जलमंदिराचा कलश वर्धापन सोहळा येत्या ७ मे रोजी!
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे गावची मुळमाया आदिदेवता आदीशक्ती बिळवस येथील श्री देवी सातेरी देवालय मंदिराच्या गाभाऱ्यावरील कलश वर्धापन दिन सोहळा ७ मे रोजी संपन्न होत आहे.
सकाळी ८ ते ९ या वेळात गणेश पुजन व पुरोहितांच्या मंत्रघोषात कलश पुजन, ९ ते ११ धार्मिक विधी, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, ३ ते ५ श्री सत्यनारायणाची महापुजा, ५ ते ७ महाआरती, प्रार्थना, तिर्थप्रसाद, ७ ते १० स्थानिक ग्रामस्थांची भजने, रात्री ठीक १० वाजता ओंकार पारंपारिक लोककला दशावतार नाट्य मंडळ, यांचा दणदणीत दशावतार नाट्यप्रयोग.
उपस्थित राहण्याचे आवाहन बिळवस ग्रामस्थ व श्री देवी सातेरी देवालय ट्रस्ट बिळवस यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)