रिल्स मालवणी ॲवाॅर्ड शो संपन्न.
उद्योजक दत्ता सामंत, प्रभाकर सावंत व मान्यवर उपस्थित.
लेखक गंगाराम गवाणकर यांचा सन्मान.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : मालवणी रिल्स आयोजित मालवणी अवॉर्ड शो सोहळा शुक्रवारी रात्री कुडाळ येथे संपन्न झाला. ४ एप्रिल या मालवणी दिवसाचे औचित्य साधून सलग तिसऱ्या वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा कला सिंधू सन्मान वस्रहरणकार गंगाराम गवाणकर यांना यावेळी प्रदान करण्यात आला. विविध श्रेणीतील मालवणी अवॉर्डसचे यावेळी वितरण करण्यात आले.
‘सन्मान बोलीभाषेचो,अभिमान मालवणी माणसाचो’ असे ब्रीद वाक्य घेऊन रिल्स मालवणी यांच्या वतीने या भव्य मालवणी अवॉर्डस् सोहळ्याचे आयोजन येथील मराठा समाज हॉल मध्ये करण्यात आले होते. ४ एप्रिल हा मालवणी नाट्यसम्राट मच्छिन्द्र कांबळी यांचा जन्मदिवस. तो दिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवसाचे औचित्य साधून रिल्स मालवणी यांच्या वतीने मालवणी भाषेसाठी कार्य करणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था, नाटक, सिनेमा, मालिका, कलाकार याना मालवणी अवॉर्ड देऊन गौरविले जाते. यंदा या ॲवॉर्ड सोहळ्याचे तिसरे वर्ष होते.
सोहळ्याचे उदघाटन वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि मच्छिन्द्र कांबळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. रंगमंचाचे उदघाटन उद्योजक दत्ता सामंत यांनी श्रीफळ वाढवून केले. यावेळी गंगाराम गवाणकर, दत्ता सामंत, प्रभाकर सावंत, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, कला दिग्दर्शक सुमित पाटील, रणजित देसाई, संगीतकार विजय गवंडे, प्रणय तेली, रंगकर्मी केदार देसाई, अविनाश वालावलकर, आनंद शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, ओंकार तेली, उद्योजक जितेंद्र सावंत, रिल्स मालवणीचे अध्यक्ष तुषार तळकटकर, तेजस मसके, विठ्ठल तळवलकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मान्यवर दत्ता सामंत यांनी रिल्स मालवणीच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. मान्यवर प्रभाकर सावंत यांनी देखील शुभेच्छा देताना मालवणी चारोळ्या सादर केल्या. रिल्स मालवणीच्या वतीने दिला जाणारा यंदाचा कला सिंधू सन्मान वस्त्रहरण नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर याना प्रदान करण्यात आला. शाल श्रीफळ, रोख ११ हजार, सन्मान चिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्कराचे स्वरूप आहे. निवेदक अमर प्रभू यांनी मानपत्राचे वाचन केले. सत्काराला उत्तर देताना गंगाराम गवाणकर यांनी आपल्या मिश्किल शैलीत काही किस्से सांगून आपण मालवणी भाषेमुळे कसे घडलो हे सांगितले. मालवणी नटसम्राट मच्छिन्द्र कांबळी यांच्या आठवणी देखील त्यांनी जागविल्या. विश्वजित पालव यांनी पारंपरिक गाऱ्हाणे सादर केले. मान्यवरांच्या हस्ते विविध श्रेणीतील अवॉर्ड्स यावेळी प्रदान करण्यात आली. यामध्ये सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक स्त्री – कोकणी बायलमाणूस निशा आजगावकर, सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक पुरुष – अमोल सावंत, सर्वोत्कृष्ट मालवणी गीत – याद तेची येता दादा मडकईकर आणि विजय गवंडे, सर्वोत्कृष्ट मालवणी एकांकिका – पोर्ट्रेट – जेजे आर्ट स्कूल, सर्वोत्कृष्ट मालवणी नाटक – खेळो – पची प्रोडक्शन, सर्वोत्कृष्ट मालवणी कुटुंब – कलर्स ऑफ कोकण, सर्वोत्कृष्ट मालवणी दशावतार – राजीव सदाशिव हरियाण, सर्वोत्कृष्ट मालवणी बालकलाकार- कोकणकन्या सावी – सावी मुद्राळे, सर्वोत्कृष्ट मालवणी खाद्य संस्कृती – खावचे गोष्टी – निशा केळुसकर, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेत्री – श्रद्धा खानोलकर, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेता – मुकेश जाधव, आणि दशावतार वर आधारित सर्वोत्कृष्ट मालवणी रील -ऋत्विक धुरी, आकाश सकपाळ याना मान्यवरांच्या हस्ते हि अवॉर्ड वितरित करण्यात आली.
यावेळी विविध नृत्य कलाकारांनी नृत्य सादर केली तसेच नेरुरच्या कलाकारांनी रॉम्बॅट सादर केले. निलेश गुरव, बदल चौधरी आणि रुचिता शिर्के यांनी समयोचित निवेदन केले व प्रेक्षकांशी संवाद साधला.
या सोहळयाला तहसीलदार वीरसिंग वसावे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी रिल्स मालवणीचे तुषार तळकटकर, विठ्ठल तळवलकर, तेजस मसके, रुचिता शिर्के, रामचंद्र आईर, हर्षवर्धन जोशी, तुषार देवळी, शरावती शेट्टी, चांदणी कांबळी, किशोर नाईक, मनिष पाटकर, रोहन नेरुरकर, निलेश गुरव, परशुराम पुजारी, ओंकार मसके, गौरव पाटकर, साईराज नाईक, विश्वजीत पालव, सचिन कोंडस्कर, अमर प्रभु, उपेंद्र पवार, भावेश तळवलकर, रामचंद्र राणे, किरण मेस्त्री, पुजा सावंत, वैभव सावंत, विवेक पालकर, सचिन तळवलकर, आशीष करंगुटकर, अभिषेक पवार, आरव आईर, कैलास पालव, चव्हाण आदी सदस्य उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)