ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
राज स्पोर्ट संघाकडे वैभव नाईक चषकाचे विजेतेपद.

राज स्पोर्ट संघाकडे वैभव नाईक चषकाचे विजेतेपद.

प्रकाशन: 26 Mar 2025 09:01 PM
वाचन संख्या 144

आचरा शिवसेनेची (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा .

वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेला माजी आमदार वैभव नाईक, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, विभाग प्रमुख समीर लब्दे, विभाग संघटक मंगेश टेमकर, पप्पू परुळेकर आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित.

आचरा | ब्यूरो न्यूज : माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा विभागाच्या वतीने वैभव नाईक चषक भव्य ओव्हरआर्म लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि. २३, ते २५ मार्च २०२५ या कालावधीत आचरा भंडारवाडी मैदानावर ही स्पर्धा संपन्न झाली. वैभव नाईक यांनी अंतिम सामन्याला उपस्थिती दर्शवत क्रिकेटचा आनंद घेतला. यावेळी शिवसैनिकांनी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक राज स्पोर्ट संघ मालक – सौरभ सावंत यांनी पटकाविले. द्वितीय क्रमांक सान्वी स्पोर्ट मसुरा यांनी पटकाविला तर अन्वी स्पोर्ट भगवंतगड मालक अमोल मांजरेकर यांनी तृतीय क्रमांक व सिराॅक बिच रिसाॅट संघ मालक रुपम टेमकर यांनी चौथा क्रमांक पटकाविला.

अंतिम सामन्यांचा शुभारंभ मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते करण्यात आला. वैभव नाईक यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

यावेळी मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, युवासेना मालवण शहर प्रमुख सिद्धेश मांजरेकर, जेष्ठ उद्योजक आबा दुखंडे, तेजस राणे, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, आचरा विभाग संघटक मंगेश टेमकर, आचरा विभाग संघटक पप्पू परुळेकर, उपविभाग प्रमुख सचिन रेडकर, चिंदर उपविभाग प्रमुख अनिल गावकर, आचरा युवासेना शहर प्रमुख विद्यानंद परब, माणिक राणे, पळसंब उपसरपंच अविराज परब, आचरा मच्छीमार नेते नारायण कुबल, राजु नार्वेकर, आबा हुदेकर, ग्रामपंचायत सदस्य बाप्पा वायंगणकर आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व क्रिकेट प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स