ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हडी येथे आरोग्य शिबिर संपन्न.

हडी येथे आरोग्य शिबिर संपन्न.

प्रकाशन: 10 Mar 2025 07:16 PM
वाचन संख्या 78

मसुरे | प्रतिनिधी : हडी जेष्ठ नागरिक संघ हा सर्वांसाठी विविध उपक्रम राबवत असतो. संघाच्या सर्व उपक्रमांना प्रतिसाद सुद्धा तितकाच चांगला लाभतो. केवळ ज्येष्ठांच्या नाहीतर सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा आरोग्य शिबिराचा उपक्रम इतर जेष्ठ नागरिक संघानी सुद्धा अनुकरण करावा असाच आहे. भविष्यात या ज्येष्ठ नागरीक संघाला आवश्यक असलेले सर्वतोपरी सहकार्य ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात येईल असे प्रतिपादन हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी येथे केले. फेस्कॉन सलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ हडी च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त हडी जठारवाडी शाळा नंबर २ येथे मोफत आरोग्य शिबिर रविवारी आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

या शिबिराचा ७० ग्रामस्थांनी लाभ घेतला. शिबिरामध्ये डायबेटीस, अस्थमा, हिमोग्लोबिन, थायरॉईड याची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी माधवबाग येथील डॉक्टर अमेय पाटकर, डॉ स्वप्न जाधव, रुपेश सोनावडेकर, संजना परब, अमिता मटकर, रिया कोचरेकर, रोहित हळवी, संजय मळगावकर उपस्थित होते.

शिबिराचा शुभारंभ सरपंच प्रकाश तोंडवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष देविदास सुर्वे, उपाध्यक्ष श्रीमती आरती कदम, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, उपसचिव भालचंद्र सुतार, कोषाध्यक्ष प्रभाकर सुतार, सल्लागार चंद्रकांत पाटकर, सदस्य महादेव सुर्वे, जानु कदम, अनंत घाडी, रमेश कावले, प्रभाकर चिंदरकर, दिनकर सुर्वे, उमेश हडकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन चंद्रकांत पाटकर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स