ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणातील आरोग्य व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

मालवणातील आरोग्य व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 10 Mar 2025 04:23 PM
वाचन संख्या 194

जागतिक महिला दिन व स्वराज्य ढोल – ताशा पथक वर्धापन दिनानिमित्त सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, स्वराज्य संघटना, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, मातृत्व आधार फाऊंडेशन, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर, सिंधुदुर्ग व पडवे हॉस्पिटल यांचा संयुक्त उपक्रम.

मालवण | ब्यूरो न्यूज : जागतिक महिला दिन व स्वराज्य ढोल – ताशा पथक वर्धापन दिनानिमित्त सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, स्वराज्य संघटना, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, मातृत्व आधार फाऊंडेशन, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर, सिंधुदुर्ग व पडवे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीरात ५६० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच यावेळी २२ जणांनी रक्तदान केले.

८ मार्च २०२५ रोजी संपन्न झालेल्या या शिबिराचे उद्घाटन मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे व जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व शिवप्रतिमेस पुष्पहर अर्पण करून झाले. यावेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष, वाइल्ड रेस्क्यूअर सिंधुदुर्गच्या सल्लागार सौ. शिल्पा खोत, मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, सचिव दादा वेंगुर्लेकर, लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष बाळू अंधारी, क्रीडा अधिकारी शितल शिंदे, क्रीडामागदर्शक माधुरी घराळ आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात हृदयरोग तपासणी, युरोलॉजी तपासणी, जनरल सर्जरी, कर्करोग तपासणी, प्रसुतीशास्त्र, स्त्रीरोग तपासणी, नेत्र तपासणी, अस्थिरोग तपासणी, नेफ्रोलॉजी तपासणी, दंतरोग चिकित्सा करण्यात आली. ५६० जणांची तपासणी करण्यात आली. रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. यामध्ये मोतीबिंदूच्या ५० रुग्णांचे निदान झाले असून त्यांच्यावर शासकीय योजनेतून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेजच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी तहसीलदार वर्षा झाल्टे व जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांचा विशेष सन्मान शिवप्रेमी समाजसेविका सौ. शिल्पा खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वराज्य ढोल ताशा पथकाचा वर्धापन दिन केक कापून साजरा झाला.

यावेळी माजी नगरध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक यतीन खोत, माजी नगरसेवक मंदार केणी, दर्शना कासवकर, भाई कासवकर, शांती तोंडवळकर, साक्षी मयेकर, प्रतिभा चव्हाण, स्वाती तांडेल, अश्विनी आचरेकर, दिक्षा लुडबे, मुकेश बावकर, महेश कारेकर, गणेश प्रभुलीकर, राजा शंकरदास, अनुष्का चव्हाण, अंजली आचरेकर, रेखा गावकर, मनाली दळवी, मानसी घाडीगावकर, ललित चव्हाण, भाऊ सामंत, नंदा सारंग, अंजना सामंत व मालवण मधील विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरीक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स