येत्या काळात हा मतदार संघ विकासाभिमुख बनेल.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे डांगमोडे येथे प्रतिपादन.
मसुरे | प्रतिनिधी : मागच्या दहा वर्षांपासून वाहतुकीस धोकादायक बनलेला डांगमोडे बेलाचिवाडी या रस्त्याच्या कामास आता सुरुवात झाली असून या भागातील आमदार बदलल्या नंतर आता हा रस्ता काही महिन्यात पूर्ण होत आहे. गेल्या दहा वर्षात मागील आमदारांमुळे विकासापासून वंचित राहिलेला मालवण कुडाळ हा मतदार संघ आता निलेश राणे हे आमदार बनल्याने विकासाभिमुख बनेल. त्यामुळे आगामी काळात याभागातील उर्वरित समस्या पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असेल असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी डांगमोडे येथे बोलताना केले.
मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे वार्षिक भवानी देवीचा गोंधळ उत्सवाच्या निमित्ताने नवतरुण मित्रमंडळाच्यावतीने ज्येष्ठ महिलांचा सत्कार, पुरुष व महिलांची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी जी प अध्यक्ष सौ सरोज परब, माजी प स सदस्य सौ. गायत्री ठाकूर, महेश बागवे, वेरली सरपंच धनंजय परब, मालोंड सरपंच पूर्वा फणसगावकर, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, पूजा ठाकूर बाळा आंगणे, मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर, मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, पत्रकार प्रफुल्ल देसाई, अमित खोत, दत्तप्रसाद पेडणेकर, नारायण ठाकूर, गार्गी चव्हाण, पंकज वर्दम उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत पांडुरंग ठाकूर यांनी केले.
यावेळी बोलताना दत्ता सामंत म्हणाले, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुढील काळात हा गाव विकासात पुढे राहणार आहे. छोटू ठाकूर आणि सहकारी यांनी सुचविलेल्या विकासात्मक बाबी राणे कुटुंबियांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील. पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत. दिल्लीत खासदार नारायण राणे तर हक्काचा आमदार निलेश राणे यांच्या रूपाने आपल्याला मिळाल्याचे सांगितले
यावेळी नवतरुण मित्रमंडळाच्या वतीने डांगमोडे येथील ज्येष्ठ महिलांचा महिला दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश ठाकूर तर आभार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी मानले.
यावेळी जितेंद्र परब, पुरुषोतम शिंगरे, शिवाजी परब, बाबू आंगणे, जगदीश चव्हाण, सचिन पाटकर, बाळप्रकाश ठाकूर, राजा ठाकूर, महेश ठाकुर, सोमा ठाकूर, हरी ठाकूर, मोहन ठाकूर, मंगेश ठाकूर, परशुराम चव्हाण, ओमकार ठाकूर, किशोर ठाकूर, कमलेश ठाकूर, बुधाजी ठाकूर, रमेश ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, प्रदीप ठाकूर, कृष्णकांत ठाकूर, सौ शर्वरी ठाकूर, सुरेंद्र ठाकूर, सौ मीनल ठाकूर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)