महाराष्ट्रात १ लाख ३९ हजार ४३४ कोटींची परकीय गुंतवणूक.
आमदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह महायुती सरकारचे केले अभिनंदन.
मालवण | ब्यूरो न्यूज : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महायुती सरकारचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्रात मागील नऊ महिन्यात १ लाख ३९ हजार ४३४ कोटींची परकीय गुंतवणूक महायुती सरकारच्या माध्यमातून आणली गेली आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीच्या परकीय गुंतवणुकीच्या डिसेंबर २०२४ अखेरच्या अहवालानुसार २०२४ -२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या ९ महिन्यात आतापर्यंत १ लाख ३९ हजार ४३४ कोटींची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात खेचून आणल्याबद्दल आ. निलेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार महायुती सरकारचे अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)