ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुडाळ येथे ९ मार्चला निवेदन व भाषण कला प्रशिक्षण.

कुडाळ येथे ९ मार्चला निवेदन व भाषण कला प्रशिक्षण.

प्रकाशन: 08 Mar 2025 10:06 AM
वाचन संख्या 82

प्रतिनिधी : कुडाळ येथे ९ मार्च रोजी, आधार कन्सल्टन्सी व फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्गच्या वतीने ‘निवेदन व भाषण कला प्रशिक्षण शिबिर’ आयोजीत करण्यात आले आहे. हे एकदिवसीय शिबीर हाॅटेल लेमन ग्रास, कुडाळ येथे सकाळी ९ ते ७ वेळेत संपन्न होईल. या प्रशिक्षणाचे मूल्य रुपये २,५००/_ ( दोन हजार पाचशे रुपये) असून अधिक माहितीसाठी ॲड. नंदन वेंगुर्लेकर ( मोबाईल क्र. ९४२२४३४३४६) यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे. भाषण कलेने आपला प्रभाव वाढवावा तसेच भाषण कौशल्याचा विकास करणे हे या शिबिराचे प्रमुख उद्देश आहेत.

श्री राजेश सावंत( निवेदक व प्रेरक वक्ता, इन्फो मोटीव्ह) आणि श्रीम. सुमन केळुसकर ( प्रशिक्षक व निवेदिका, स्किल्स एज्युकेशन) हे या शिबिराचे प्रशिक्षक आहेत. शिबिरातील कार्यशाळा ही थिअरी व प्रॅक्टीकल स्वरुपात असून प्रत्यक्षात अनुभव घेतल्यावर शिबिराचा हा एक दिवस अविस्मरणीय ठरेल असे ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगितले असून शिबिरात जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. शिबिरात प्रवेश मर्यादित असून प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स