ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मालवणात ८ मार्चला मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर.

मालवणात ८ मार्चला मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर.

प्रकाशन: 07 Mar 2025 02:09 PM
वाचन संख्या 97

जागतिक महिला दिनाचे औचित्य ; सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, स्वराज्य संघटना, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान, मातृत्व आधार फाऊंडेशन, वाइल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग, एसएसपीएम हॉस्पिटल, लायन्स क्लब मालवण आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांचा संयुक्त उपक्रम.

मालवण | ब्यूरो न्यूज : जागतिक महीला दिनाचे औचित्य साधून सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, स्वराज्य संघटना, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान, मातृत्व आधार फाऊंडेशन, वाइल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग, एसएसपीएम हॉस्पिटल, लायन्स क्लब मालवण आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ८ मार्च रोजी सकाळी ९ ते १ यावेळेत मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन व स्वराज्य ढोल ताशा पथक, मालवण यांचा वर्धापन दिन आहे.

या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी व आजाराचे निदान (डिटेक्ट) झाल्यास शस्त्रक्रिया मोफत केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. या शिबिरात हृदयरोग तपासणी, कर्करोग तपासणी, अस्थीरोग तपासणी, युरोलॉजी तपासणी, प्रसुतीशास्त्र आणि स्त्रीरोग तपासणी, नेफ्रोलॉजी तपासणी, जनरल सर्जरी, नेत्र तपासणी, दंतरोग चिकित्सा केली जाणार आहे.

शिबिरात सहभागासाठी सौ. शिल्पा खोत 9422584641, दिक्षा लुडबे 8605635741, सौ. अश्विनी आचरेकर 9420338746, सौ. निकिता तोडणकर 75888472876, महेश अंधारी 9423051637, बावकर 9422096903 यांच्याशी संपर्क करावा अशी माहिती देण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स