अशोक दाभोलकर मेस्त्री व सौ. मंजुषा दाभोलकर मेस्त्री यांचा सन्मान.
मसुरे | प्रतिनिधी : नुकत्याच ज्ञानप्रसाद मंगल कार्यालय, ब्राह्मण आळी, जालगाव, दापोली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात दाभोली, वेंगुर्ला सिंधुदुर्गचे भूतपूर्व फेडरेशन शूटिंगबॉल पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक श्री अशोक दाभोलकर मेस्त्री व सौ. मंजुषा दाभोलकर मेस्त्री ह्यांना दापोली कृषी विद्यापीठाचे प्रोफेसर मा. डॉ. संजय तोरणे (हेड डिपार्टमेंट ऑफ अग्रीकलचर) ह्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या भाषणात डॉ, तोरणे म्हणाले की, शूटिंगबॉल खेळात सामान्य खेळाडू म्हणून आपल्या क्रीडा जीवनाला सुरुवात करणाऱ्या दाभोलकर सरानी फेडरेशन पंच, स्पर्धा नियंत्रक, निरिक्षक, प्रशिक्षक, आयोजक आदी विविध भूमिकाना न्याय देत शूटिंगबॉल खेळावर अभ्यासपूर्ण लिखाण करीत केलेल्या जनजागृतीचा विशेष उल्लेख केला.
सेवानिवृत्तीनंतरही श्री दाभोलकर ग्रामीण शाळातील पालक व पाल्याना भेटून खेळ व शिक्षण नाण्याच्या दोन बाजू ह्या विषयावर करतात याबद्दल श्री. अशोक दाभोलकर यांची विशेष प्रशंसा करण्यात आली
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)