ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
पहिली ते नववीच्या परीक्षा एकाचवेळी.

पहिली ते नववीच्या परीक्षा एकाचवेळी.

प्रकाशन: 06 Mar 2025 09:19 AM
वाचन संख्या 144

शिक्षण विभागाचा तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांबाबतही निर्णय.

ब्यूरो न्यूज : राज्यात पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा मार्च किंवा एप्रिल महिन्यात शाळा स्तरावर त्यांच्या नियोजनानुसार घेतल्या जातात. मात्र, यंदाची वार्षिक परीक्षा राज्यात एकाचवेळी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

त्यामुळे राज्यात आठ एप्रिलपासून पहिली ते नववीच्या वर्गाच्या वार्षिक परीक्षा होणार आहेत. राज्यात शाळास्तरावर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसच वार्षिक परीक्षा घेतल्या जातात. त्यानंतर एक मे पर्यंत शाळा सुरूच असते. मात्र, वार्षिक परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतच नाहीत. वर्षाच्या शेवटी परीक्षा घेण्याऐवजी त्या अगोदरच घेतल्या जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पुरेसा कालावधी मिळत नाही. याशिवाय वार्षिक परीक्षेचे राज्यातील सर्व शाळांचे वेळापत्रक वेगवेगळे असते. हे सर्व थांबून राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी व विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा, यासाठी राज्यातील पहिली ते नववीच्या वर्गातील वार्षिक परीक्षा एकाचवेळी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी राज्यातील शाळांच्या वार्षिक परीक्षेसाठी एकच वेळापत्रक तयार केले आहे. या वेळापत्रकाप्रमाणे राज्यातील सर्व शाळांनी परीक्षा घ्यायची आहे. स्थानिक परिस्थितीनुसार यामध्ये बदल करायचा असेल तर संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकार्‍यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांची परवानगी घेऊनच बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

२५ एप्रिलला शेवटचा पेपर

राज्यात पहिली ते नववीच्या वर्गाची वार्षिक परीक्षा आठ एप्रिलपासून सुरू होत आहे. ही परीक्षा २५ एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्यानंतर शिक्षकांनी पेपरची तपासणी करून १ मे या महाराष्ट्रदिनी विद्यार्थ्यांना निकाल द्यायचा आहे. दोन मे पासून विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी देण्यात येणार असल्याचेही त्यामध्ये नमूद केले आहे.

तोंडी – प्रात्यक्षिक परीक्षा त्या – त्या दिवशी

ज्या दिवशी ज्या विषयाचा पेपर आहे, त्याचदिवशी त्या विषयाची तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायची आहे. जर शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल, तर ती दुसर्‍या दिवशी किंवा उपलब्ध वेळेनुसार घ्यावी. दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे त्या विषयाची परीक्षा त्याच दिवशी घेण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स