ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
सतिश मुणगेकर यांना राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सतिश मुणगेकर यांना राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर.

प्रकाशन: 13 Jan 2025 02:56 PM
वाचन संख्या 217

मसुरे | प्रतिनिधी : नवी दिशा, नवे उपक्रम या राज्यस्तरीय शैक्षणिक समूहाच्या वतीने १९ जानेवारी २०२५ लाअहिल्यानगर येथे नवी दिशा नवे उपक्रम भाग – ३ पुस्तक प्रकाशन सोहळा, व महाराष्ट्रातील गुणवंत शिक्षकांना राज्य स्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून जि. प. पू. प्रा. आदर्श केंद्र शाळा चिखली नं. १, तालुका गुहागर येथील उपक्रमशिल तंत्रस्नेही शिक्षक सतिश पांडुरंग मुणगेकर यांना राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५ प्राप्त झाला आहे.गेल्या आठ वर्षांपासून नवी दिशा, नवे उपक्रम समूह सातत्याने सुरू असून महाराष्ट्रातील शिक्षकांना उपक्रम दिशा देण्याचे उत्कृष्ट कार्य करीत आहे. शिक्षक, विद्यार्थी, शाळा यांना या समूहाचा फायदा होत आहे. समूहाच्या माध्यमातून, समूह सदस्यांच्या सहभागातून देणगी दाते यांनी दिलेल्या मदतीने दरवर्षी नवनवीन सामाजिक, शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातात.यावर्षी महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांना एकत्रितकरून त्यांनी प्रत्यक्ष वर्गात राबविलेल्या उपक्रमांचे पुस्तक प्रकाशन तसेच त्यांनी केलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची समूहातर्फे दखल घेऊन त्यांना राज्य स्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार १९ जानेवारी २०२५ रोजी संजोग हॉटेल, नगर मनमाड रोड, सावेडी अहिल्यानगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

संपादक मंडळाच्या वतीने सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून भव्यदिव्य सोहळा निश्चितच संपन्न होणार आहे. अशी माहिती संपादक / समूह संयोजक श्री. देवराव चव्हाण यांनी दिलेली आहे. या सोहळ्याच्या तयारी , नियोजना करिता प्रकल्प प्रमुख श्री. बळीराम जाधव, संगीता म्हस्के, सतिश मुणगेकर सर्व संपादक निर्मिती मंडळ दिनरात्र कष्ट घेताना दिसत आहे. सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून प्रसिद्ध कवी श्री. तुकाराम धांडे, प्रसिद्ध लेखिका अंजलीताई अत्रे , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. दत्तात्रय वारे सर यांची उपस्थिती राहणार असल्याचे संपादकांनी सूचित केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स