ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
आ. निलेश राणे यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र श्री नवनाथ तपोभूमी देव डोंगर कडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमीपूजन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आ. निलेश राणे यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र श्री नवनाथ तपोभूमी देव डोंगर कडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमीपूजन.

प्रकाशन: 12 Jan 2025 08:12 PM
वाचन संख्या 41

कुडाळ | प्रतिनिधी : पावशी व आंबडपाल येथील तीर्थक्षेत्र श्री नवनाथ तपोभूमी देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले जिल्हा नियोजनचे सदस्य काका कुडाळकर यांच्या निधीमधून हा खर्च होणार आहे. पावशी व आंबडपाल सीमेवर असलेले तीर्थक्षेत्र श्री नवनाथ तपोभूमी देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. हा रस्ता व्हावा म्हणून भक्तांसह ग्रामस्थांनी मागणी केली होती.

जिल्हा नियोजन सदस्य काका कुडाळकर यांच्या निधीतून हा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. या देव डोंगराबरोबरच कुडाळ शहराला पाणीपुरवठा करणारी टाकी देखील आहे. रस्ता झाल्यामुळे भाविक व ग्रामस्थांना वाहने व्यवस्थित तीर्थक्षेत्र पर्यंत घेऊन जाता येणार आहेत. या रस्त्याचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा नियोजन सदस्य व राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, पावशी सरपंच वैशाली पावसकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, सर्वेश पावसकर, शिवसेना तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, अरविंद करलकर, तेंडोलकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स