ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
जनतेने आपल्या कारभाराला टाळे का ठोकले याचा विचार आधी वैभव नाईक यांनी करावा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जनतेने आपल्या कारभाराला टाळे का ठोकले याचा विचार आधी वैभव नाईक यांनी करावा.

प्रकाशन: 10 Jan 2025 01:58 PM
वाचन संख्या 88

शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी यांचे प्रत्युत्तर.

कुडाळ | प्रतिनिधी : कुलूप आणि उबाठा याचे नाते अलीकडे घट्ट व्हायला लागले आहे. उद्धव ठाकरे उबाठाचे मुख्यमंत्री बनले तेव्हाही राज्याला टाळेच ठोकले गेले होते. मागील दहा वर्षात कुडाळ मालवणच्या विकासाला लागलेले टाळे जनतेनेच खोलून इथल्या विकासाचा मार्ग आमदार निलेशजी राणे यांच्या रूपाने मोकळा केला आहे. जनतेला विकास हवा आहे, वैभव नाईकांची कुलूपाची दळभद्री भाषा नव्हे असे परखड प्रतिपादन शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी केले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने खोक्याचे राजकारण करणाऱ्या उबाठासेनेला खोक्यात बंद करत हे खोके मातोश्रीच्या भंगारखान्यात फेकले आहेत. त्यातच सिंधुदुर्गातले खोके जमा झाले आहेत. त्यांचे राजकारणच फक्त राणे या नावावर चालत असल्याने नाहक टीका करून वातावरण खराब करायचे आणि प्रसिद्धीत रहायचे हा सवंग फंडा आहे.

उबाठाच्या कोणालाही विमानतळावर भाष्य करण्याचा नैतिक अधिकारच नाही. कोणाच्या खोक्यावर त्यांनी चिपी विमानतळाला विरोध केला आणि काम रखडवले हे अख्खा कोकण जाणतो. वेळीच जर नारायणराव राणेसाहेबांना साथ दिली असती तर आज हा विमानतळ आंतरराष्ट्रीय झाला असता. वैभव नाईक यांचे आताचे विमानतळासाठीचे अश्रू हे मगरीचे आहेत.

चिपी विमानतळ पुन्हा एकदा उर्जितावस्थेत आणण्यासाठी नारायणराव राणेसाहेब समर्थ आहेत. रिकामटेकड्या वैभव नाईकांनी चिपीच्या माळरानावर उंडारण्याचे रिकामधंदे आता थांबवावेत. ही वेळ सिंधुदुर्ग जिल्ह्याला नावलौकिक मिळवून देण्याची आहे, जिल्ह्याला नाहक बदनाम करण्याची नव्हे याचे भान त्यांनी जिल्हावासिय म्हणून तरी राखावे. विमानसेवा पूर्ववत सुरु नक्कीच होईल आणि जिल्ह्याची आर्थिक स्थिती सुधारेल, उद्योगधंदे विस्तारतील तसे विमानाचे भारमानही वाढेल. आमदार निलेश राणेसाहेबांची वाटचाल त्या दिशेने चालली आहे. लवकरच ही हवाई वाहतूक विस्तारेल तेव्हा मागच्या वेळेप्रमाणे माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक हे बॉक्स घेऊन पेढे वाटायला निश्चितपणे पुढे असतील हा विश्वास आहे, अशी कोपरखळी श्री रत्नाकर जोशी यांनी वैभव नाईक यांना दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स