ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
स्व. राजनभाई आंगणे प्रिमीअर लीग स्पर्धेचे दत्ता सामंत यांच्या हस्ते उद्घाटन.

स्व. राजनभाई आंगणे प्रिमीअर लीग स्पर्धेचे दत्ता सामंत यांच्या हस्ते उद्घाटन.

प्रकाशन: 11 Jan 2025 10:12 PM
वाचन संख्या 40

मालवण | प्रतिनिधी : एम क्रिकेट अकॅडमी, सावंतवाडी यांच्या वतीने मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे आयोजित स्वर्गीय राजनभाई आंगणे प्रिमीअर लीग १६ वर्षांखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे शिवसेना जिल्हाप्रमुख उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते १० जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले.

मनमिळावू स्वभावाचे प्रेमळ व्यक्तीमत्व असलेले स्व. राजन आंगणे यांनी नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांचे अचानक जाणे म्हणजे भरून न येणारी पोकळी आहे. त्यांच्या नावाने अश्या स्पर्धा सातत्याने आयोजित व्हाव्यात. राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक निर्माण करणारे खेळाडू या पुढेही यां बोर्डिंग मैदानावर घडावेत. लागेल ते सहकार्य आपण देऊ असे दत्ता सामंत यांनी सांगितले.

यावेळी मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्ले बॉईज संघाच्या माध्यमातून असलेल्या अनेक जुन्या आठवणीना उजाळा दिला. तसेच बोर्डिंग मैदानावर आयोजित अश्या स्पर्धातून अनेक खेळाडू घडतील. असे सांगत स्व. राजन आंगणे यांच्या स्मृतीना उजाळा दिला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख उद्योजक दत्ता सामंत, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष मंदार नार्वेकर, एम अकॅडमी अध्यक्ष उदय नाईक, राहुल रेगे, रघु धारणकर, बबन रेडकर, बबन रेडकर, जॉन नरोना, किसन मांजरेकर, सूर्यकांत फणसेकर, दादा नाईक, राजू बिडये, ऋषिकेश सामंत, दीपक धुरी, आंब्रोज अल्मेडा, सुशील शेडगे, संदीप भोजणे, सचिन सावंत यांसह अन्य पदाधिकारी, खेळाडू, कोच व पालक उपस्थित होते.

ही स्पर्धा १० ते १५ जानेवारी व २५ ते २९ जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. सिंधुदुर्ग व गोवा येथील १६ वर्षांखालील खालील खेळाडू विविध ५ संघात सहभागी आहेत अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स