ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कपूर परीवाराची पंतप्रधान मोदींसह भेट ; तैमूर व जहांगीरची केली पंतप्रधानांनी चौकशी.

कपूर परीवाराची पंतप्रधान मोदींसह भेट ; तैमूर व जहांगीरची केली पंतप्रधानांनी चौकशी.

प्रकाशन: 16 Dec 2024 02:46 PM
वाचन संख्या 213

ब्यूरो न्यूज : दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या जनशताब्दीनिमित्त कपूर कुटुंबीयांनी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाचं खास आमंत्रण देण्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते.

नीतू कपूर, करिश्मा कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रिद्धिमा कपूर सहानी, सैफ अली खान हे सर्वजण मोदींना भेटले. राज कपूर यांच्या चित्रपटांचा वारसा साजरा करण्यासाठी आरके फिल्म्स, फिल्म हेरिटेज फाऊंडेशन आणि नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया यांनी राज कपूर फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन केलं होतं. त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित करण्यासाठी कपूर कुटुंबीय दिल्लीला गेले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने मोदींसोबतच्या भेटीदरम्यान काय काय बोलणं झालं, याचा खुलासा केला. सैफ म्हणाला की संसदेतील कामकाजानंतर ते आम्हाला भेटायला आले होते. त्यामुळे ते जरा दमलेले असतील असा माझा अंदाज होता. पण आम्हा सर्वांना पाहताच त्यांनी स्मितहास्य केलं आणि आम्हा सर्वांशी ते खूप चांगल्याप्रकारे बोलले. करीना, करिश्मा आणि रणबीर यांच्या माध्यमातून मी त्यांना भेटू शकलो, याचा मला खूप आनंद आहे. कपूर कुटुंबीयांसाठी ही खूप मोठी सन्मानाची बाब आहे.

भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी माझ्या पालकांविषयी वैयक्तिकरित्या विचारलं. तुम्ही तैमुर आणि जहांगीरला भेटायला घेऊन याल असं मला वाटलं होतं, असंही ते मला म्हणाले. नंतर करीनाने तैमुर आणि जेहसाठी एका कागदावर त्यांचा ऑटोग्राफ घेतला. तोसुद्धा त्यांनी अत्यंत प्रेमळपणे दिला. ते आपला देश चालवण्यासाठी खूप मेहनत करत आहेत. त्यातूनही ते लोकांच्या भेटीगाठीसाठी वेळ आवर्जून काढतात. मी त्यांना विचारलं की त्यांना आराम करायला किती वेळ मिळतो. त्यावर ते म्हणाले की रात्री तीन तास झोपायला मिळतात. माझ्यासाठी तो दिवस खूप खास होता. आमच्यासाठी वेळ काढल्याबद्दल आणि आमच्या कुटुंबाला इतका मान-सन्मान दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानले’, असं त्याने पुढे सांगितलं.

राज कपूर यांच्या १०० व्या जन्मदिनानिमित्त १३ डिसेंबरपासून १५ डिसेंबरपर्यंत खास फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचसोबत राज कपूर यांचे काही चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स