ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रिपब्लिकन पक्षाची मजबूत ताकत निलेश राणे यांच्या पाठीशी खंबीर.

रिपब्लिकन पक्षाची मजबूत ताकत निलेश राणे यांच्या पाठीशी खंबीर.

प्रकाशन: 18 Nov 2024 04:56 PM
वाचन संख्या 32

प्रतिनिधी : कुडाळ मालवण मतदार संघात माजी खासदार निलेश राणे हे उच्च शिक्षित व्यक्तिमत्व महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या पाठीशी आर .पी .आय. (आठवले) पक्षाची संपूर्ण ताकत उभी आहे. आर .पी.आय .ची मते निर्णायक असून त्यांच्या विजयासाठी महत्वपूर्ण ठरणार असून त्यांच्या मताधिक्यामध्ये वाढ करण्याची भूमिका आर .पी. आय. (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव -रमाकांत जाधव व जिल्हा अध्यक्ष अजितकुमार कदम यांनी आज मांडली. त्यांच्या समवेत जिल्हा सरचिटणीस प्रकाश कांबळे, कार्याध्यक्ष सखाराम कदम, खजिनदार आनंद पेंडूरकर, कुडाळ तालूका अध्यक्ष सतीश कदम हे उपस्थित होते.

महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस(अजीत पवार)आणि आर. पी. आय. (आठवले )हीच महायुती पुन्हा विधानसभेवर सत्तेत येणार यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुमत नाही.

रिपब्लिकन जनता ही सुज्ञ आहे. ती कोणाच्याही अपप्रचाराला बळी पडणार नाही. जर आपला विकास साधायचा असेल तर महायुतीच्या माध्यमातून त्याच्या उमेदवाराला निवडून देणे आवश्यक आहे. आर .पी. आय .चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वा खाली रिपब्लिकन पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. कुडाळ मालवण मतदार संघातील तडफदार व्यक्तिमत्व निलेश राणे यांनी यापूर्वी लोकसभेमध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे देशाच्या संसदीय कामकाजाचा अनुभव आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नाची जाण आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये आपला ठसा उमटवतील असा आशावाद सर्व आंबेडकरी जनतेमध्ये असल्या कारणाने निलेश राणे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन या पत्रिकाद्वारे करण्यात येत आहे.

तसेच कणकवली मतदार संघांचे लोकप्रिय उमेदवार आमदार नितेश राणे हे कार्यक्षम आणि विकासात्मक असलेले नेतृत्व तसेच सावंतवाडी मतदार संघाचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दिपकभाई केसरकर आणि कुडाळचे भावी आमदार निलेश राणे या तीनही उमेदवारांना निवडून देण्याची गरज या घडीला आहे. त्यांच्या माध्यमातून आजवर झालेला विकास या जिल्ह्याने पाहिला आहे. त्यासाठी महायुतीचे हे तीनही उमेदवार जिल्ह्याच्या सर्वांगीण भवितव्यासाठी विधानसभेवर निवडून येणे काळाची गरज आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स