ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
साळशी येथील माजी ग्रा.पं. सदस्या सौ.प्रीती रावले यांचे निधन.

साळशी येथील माजी ग्रा.पं. सदस्या सौ.प्रीती रावले यांचे निधन.

प्रकाशन: 24 Oct 2021 12:45 PM
वाचन संख्या 245

महिला बचत गटांसाठी झटलेले व्यक्तिमत्व हरपल्याने परिसरात व्यक्त होतोय व्यक्त…..!

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील साळशी-सरमळेवाडी येथील माजी ग्रा.पं. सदस्या तथा जागृती महिला बचत गट सरमळेवाडी च्या अध्यक्षा सौ. प्रीती प्रकाश रावले(५१) यांचे शनी.२३ ऑक्टो.रोजी कर्करोगाने उपचारादरम्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,सुन,२ मुली,जावई,२ भाऊ,एक बहीण,नात असा परिवार आहे. गावात महिला बचत गटासाठी त्या खूप तळमळीने काम करायच्या.समाजसेवेची त्यांना खूप आवड होती.मनमिळाऊ आणि बोलक्या स्वभावाच्या होत्या.महिला बचतगटामार्फत त्यांनी विविध उपक्रम राबविले.तसेच साळशी हायस्कुलमध्ये मुलांना पोषण आहार शिजवून द्यायाचे काम त्यांनी केले होते. सरमळेवाडी येथील श्री वटेश्वरमंदिरात दरवर्षी होणाऱ्या महाशिवरात्रीच्या उत्सवात त्या हिरिरीने भाग घ्यायच्या.ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी सन २००२ ते २००५ या कालावधीत चांगल्याप्रकारे विकासकामे केली.समाजकार्याची त्यांना खूप आवड होती.साळशी हायस्कुलचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश नारायण रावले यांच्या त्या पत्नी होत.यावेळी माजी प.स.सदस्य तथा माजी सरपंच सुनील गावकर,ग्रामविकास मंडळ संचलित साळशी विद्यामंदिर हायस्कुलचे अध्यक्ष तथा माजी सरपंच सत्यवान सावंत,साळशी हायस्कुलचे मुख्याध्यापक माणिक वंजारे, माजी उपसरपंच राजेंद्र साटम,विक्रांत नाईक,पोलीस पाटील सौ.कामिनी नाईक आदींसह अनेकांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.शनिवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.समाजात त्या मनमिळाऊ आणि बोलक्या स्वभावाच्या होत्या.त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स