ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बेकायदेशीर दारु वाहतुकीवर इन्सुली एक्साइजची कारवाई

बेकायदेशीर दारु वाहतुकीवर इन्सुली एक्साइजची कारवाई

प्रकाशन: 24 Oct 2021 12:02 PM
वाचन संख्या 46

दारुसह पाच लाखाचा मुद्दे माल जप्त

बांदा | राकेश परब : आंबोलीमार्गे कोल्हापूरकडे केल्या जाणार्‍या बेकायदा गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात इन्सुली एक्साइजने कारवाई केली. या कारवाईत १ लाख रुपयांच्या दारुसह एकूण साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी प्रवेंद्र आत्माराम जांभळे (३१, रा. पेण, रायगड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेली कार (एमएच ०६ बीएम ५२५२) ताब्यात घेण्यात आली. सदर कारवाई बांदा – दाणोली मार्गावर ओटवणे फाटा येथे आज करण्यात आली.
ही कारवाई जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक टी. बी. पाटील, यु. डी. सावंत, सहाय्यक दुय्यम निरीक्षक पी. बी. देशमुख, जवान आर. डी. ठाकूर, पी. एस. माळी, एन. एम. कलकुटकी, संदिप कदम, ए. जी. जाधव यांच्या पथकाने केली. अधिक तपास तानाजी पाटील करीत आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स