ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून श्रीलोचन आश्रमाची सुरुवात.

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून श्रीलोचन आश्रमाची सुरुवात.

प्रकाशन: 24 Oct 2021 12:48 PM
वाचन संख्या 78

बांदा | राकेश परब : श्रीलोचन बालविकास केंद्र, निराधार, अनाथ,आदिवासी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने नुकतेच सुरू केले.
कोरोनाने भारतातील अनेक मुलांना अनाथ केले, करोडो लोकांना उपसमारीला सामोरे जावे लागले आणि लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येक लोकांना मानसिक ताप सहन करावा लागला आणि कर्जबाजारीपणा सुद्धा वाढला.
अजून ही बरीच अशी मुले आहेत ज्यांच्या घरचा कमावता व्यक्ती गेला, आणि कित्येकांनी आई वडील पण गमावले.
अशा जास्तीत जास्त मुलांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून श्रीलोचन आश्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
प्रत्येक आईवडील आपली मुले मोठी होऊन आपली स्वप्न पूर्ण करतील असे स्वप्न उराशी बाळगतात, माझ्या आईवडिलांचे स्वप्न होते की आपण ज्या परिस्थितीतुन आलो अशा परिस्थितीत असलेल्या जास्तीतजास्त मुलांना मदतीचा हात द्यावा. संस्थेने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना मदत केली असून, ज्यांची काळजी घ्यायला कोणी नाही अशा मुलांसाठी श्रीलोचन आश्रम सुरू करून आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी अजून पुढचे पाऊल उचलले आहे.
या आश्रमातील प्रत्येक मुलाच्या आरोग्य, शिक्षणाबरोबर त्यांचा सर्वांगिण विकास करण्यात संस्था संपूर्ण पुढाकार घेणार आहे.
अंदाजे ३० मुलांची जबाबदारी या आश्रमाच्या माध्यमातून संस्था घेणार असून २१ ऑक्टोबरला या आश्रमाचे उद्घाटन सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते टिटवाळा येथे करण्यात आले.
यावेळी संस्थाध्यक्ष दयानंद कुबल , प्रेम कुबल, व्यवस्थापक सुरज कदम, राहुल शिंदे, योगिता निजामकर, सचिन धोपट, अक्षय ओवळे, मनोज वाळिंबे, साक्षी पोटे, स्वाती नलावडे आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स