ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हाताला धरून समाजकारण शिकवणाऱ्या गुरु समान नवलराज काळे यांच्यावर नवनाथ झोरे यांनी टीका करणे हास्यास्पद.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हाताला धरून समाजकारण शिकवणाऱ्या गुरु समान नवलराज काळे यांच्यावर नवनाथ झोरे यांनी टीका करणे हास्यास्पद.

प्रकाशन: 07 Nov 2024 01:09 AM
वाचन संख्या 46

दहा वर्षात वैभव नाईक यांनी धनगर समाजासाठी काहीच केलं नाही, जनता त्यांना या निवडणुकीत घरचा रस्ता दाखवेल : भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस तथा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख दीपक खरात.

कुडाळ | ब्यूरो न्यूज : भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस तथा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख दीपक खरात यांनी ऑल इंडिया धनगर समाजाचे माजी पदाधिकारी नवनाथ झोरे यांनी नवलराज काळे यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. दीपक खरात यांनी म्हणले आहे की हाताला धरून समाजकारण शिकवणाऱ्या गुरु समान नवलराज काळे यांच्या वरती नवनाथ झोरे यांनी केलेली टीका हास्यास्पद आहे. तसेच नवनाथ झोरे कोण आहेत व त्यांचे धनगर समाजासाठी योगदान काय असा सवाल देखील दीपक खरात यांनी केला आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी धनगर समाजासाठी काय केले ते आम्ही पुराव्यानिशी दाखवू परंतु तुमच्यात हिंमत आहे का नवनाथ आमदार वैभव नाईक यांनी काय काय कामे केली ती जाहीर करण्याची असे आवाहन दीपक खरात यांनी केले आहे. तसेच नवलराज काळे यांनी मालवण कुडाळ मधील अनेक धनगर वस्त्यांना निधी मिळवण्यासाठी भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदावरून प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यांच्यासोबत आम्ही देखील काम पाहत आहोत असे दीपक खरात यांनीम्हटले आहे. ज्या ठिकाणी जमिनीच्या अडचणी आहेत त्या ठिकाणी स्वतः जमीन मालकांची खुद्द नवलराज काळे संपर्क करत आहेत. त्यामुळे नवलराज काळे जिथे असतील तिथेच धनगर समाजाचे बांधव असतील. नवलराज काळे दांडगा पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणारा नेतृत्व आहे याचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. येणाऱ्या काळात ही सर्व कामे मार्गे लागतील आणि ती सर्व कामे निलेश राणे साहेब यांच्या माध्यमातूनच होतील. वैभव नाईक यांनी गेले दहा वर्षे धनगर समाजाचा फक्त वापर केला आहे. निवडणुकीपूर्ती समाजाला जवळ करणे एवढाच धंदा वैभव नाईक यांनी गेले दहा वर्ष राबवला असे प्रत्युत्तर दीपक खरात यांनी नवनाथ झोरे यांनी केलेल्या टीकेला दिले आहे. धनगर समाज आता सुज्ञ आहे. या निवडणुकीतून धनगर समाज नक्कीच विधानसभा उमेदवार वैभव नाईकांना त्यांची जागा दाखवून देईल. यावेळी आमदार म्हणून निलेश राणेच निवडून येतील आणि राणेसाहेब धनगर समाजाचा विकास करू शकतात हे वारंवार या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिद्ध झाल आहे. त्यामुळे टीका करत असताना विचारपूर्वक करा अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा इशारा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा सरचिटणीस तथा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख दीपक खरात यांनी नवनाथ झोरे यांना दिला आहे. जे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे माजी उपाध्यक्ष म्हणून मिरवता त्या पदावर नवलराज काळे यांनीच तुमची निवड केली होती. परंतु त्या पदावर ती आपण योग्य काम करू शकला नाहीत समाजाला न्याय देऊ शकला नाहीत म्हणून आपल्याला संघटनेतून फेरनिवड मिळाली नाही असेही त्यांनी सांगितले आहे. स्वतःच्या घराकडे जाणारा रस्ता सुद्धा तुम्हाला वैभव नाईक यांच्याकडून मंजूर करून घेता आला नाही. त्यामुळे वैभव नाईकांसाठी समाजाच्या नेतृत्वावरती टीका करू नका नवनाथ झोरे यांना दीपक खरात यांना सल्ला दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स