महाराष्ट्र भूषण, पद्मश्री श्री सद्गुरु डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आमदार नितेश राणे यांनी घेतले शुभाशीर्वाद.
कणकवली | प्रतिनिधी : जनसेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ निरुपणकार आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता. अलिबाग, रायगड) चे अध्यक्ष महाराष्ट्र भूषण,पद्मश्री श्री सद्गुरु डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन भाजप महायुतीचे कणकवली विधानसभेचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी शुभाशीर्वाद घेतले. श्री सद्गुरु चरणी जाऊन दर्शन घेत आमदार नितेश राणे यांनी आशीर्वाद घेतले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)