ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणच्या हाॅटेल कर्मचारी महिलेचा प्रामाणिकपणा.

मालवणच्या हाॅटेल कर्मचारी महिलेचा प्रामाणिकपणा.

प्रकाशन: 04 Nov 2024 05:03 PM
वाचन संख्या 396

कोकण फ्युजन फूड अड्डा’ मध्ये ज्येष्ठ नागरीक ग्राहकाची हरवलेली सोन्याची अंगठी केली स्वाधीन ; मालवणच्या पर्यटन व्यवसायातील प्रामाणीकपणाची ग्राहकांनी केली प्रशंसा.

मालवण | प्रतिनिधी : मालवण धुरीवाडा येथील हाॅटेल कोकण फ्युजन मध्ये काम करणार्या महिला कर्मचारी सौ. मनाली पराडकर यांना काम करताना आढळलेली सोन्याची महागडी अंगठी त्यांनी हाॅटेल मालक श्री अमित हडकर व श्री सांगळे यांच्या उपस्थितीत अंगठीचे मूळ मालक तथा ज्येष्ठ नागरीक श्री शंकर साळुंके ( बोरीवली, मुंबई) यांच्याकडे सुपूर्त केली. ३ नोव्हेंबर रोजी रात्री, हाॅटेल कोकण फ्यूजन येथे श्री शंकर साळुंके व कुटुंबिय, जेवण आटपून व बिल अदा करुन मालवण येथून काही अंतर रवाना झाले होते. दरम्यान सौ. मनाली पराडकर यांना काम करताना एक सोन्याची अंगठी सापडली व त्यांनी तत्काळ हाॅटेल मालक श्री अमित हडकर व श्री. सांगळे यांना त्याची कल्पना दिली. थोड्याच वेळात काही अंतर मार्गस्थ झालेले अंगठीचे मालक श्री. शंकर साळुंके व कुटुंबिय हाॅटेल कोकण फ्यूजन मध्ये परत आले व त्यांनी त्यांच्याकडील अंगठीचा वर्णनासहीत फोटो हाॅटेल मालकांना दाखवला व अंगठीच्या मूळ मालकाची ओळख पटली.

श्री शंकर साळुंके व कुटुंबियांनी कोकण फ्युजन हाॅटेल व्यवस्थापन व सौ. मनाली पराडकर यांचे भारावून जात आभार मानले. श्री शंकर साळुंके व कुटुंबियांनी मालवणच्या हाॅटेल तथा पर्यटन व्यवसाय क्षेत्राची प्रशंसा केली आहे. यावेळी कोकण फ्युजन हाॅटेलचे मालक श्री हडकर व श्री सांगळे यांच्या सह कर्मचारी सौ. मनाली पराडकर, श्री शंकर साळुंके, साळुंके आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स