ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
आमदार वैभव नाईक व माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत वारंगाची तुळसुली येथील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आमदार वैभव नाईक व माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत वारंगाची तुळसुली येथील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल.

प्रकाशन: 04 Nov 2024 03:36 PM
वाचन संख्या 146

भाजपला कुडाळ – मालवण मतदारसंघात धक्क्यावर धक्के.

राणेंच्या घराणेशाहीला कंटाळूनच पक्षप्रवेश :धाकू जाधव.

कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ – मालवण मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली गौतमवाडी येथील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काल आ.वैभव नाईक व माजी आ.परशुराम उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षात त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.

आमदार वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते वारंगाची तुळसुली गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी बोलताना धाकू जाधव म्हणाले की राणे साहेब स्वतः खासदार असून देखील त्यांनी आपल्या दोन्ही चिरंजीवांना विधानसभेत उमेदवारी दिली आहे. राणे हे घराणेशाही करत असून सर्वसामान्य नेतृत्वाला पुढे येऊ देत नसल्याने आपण आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करत असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास कार्यकर्त्यांनी दाखवला त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत वारंगाची तुळसुली गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना दिला आहे.

यावेळी धाकू जाधव, निलेश जाधव, सत्यवान जाधव,संतोष जाधव, रामा जाधव, संतोष जाधव,महेश जाधव, मयूर चव्हाण, अनिल चव्हाण, भिसाजी जाधव, दत्तू कदम, छाया जाधव पूजा कदम, प्रियंका जाधव, अशोक जाधव, रामा जाधव संतोष जाधव व शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे,विभाग प्रमुख गुरु सडवेलकर,उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर,घावनळे विभाग प्रमुख पप्पू महाडेश्वर, तुळसुली शाखाप्रमुख उदय तुळसुलकर, मांडकुली सरपंच तुषार सामंत, बाबा वारंग,आनंद वारंग, प्रमोद मेस्त्री, केरवडे उपशाखाप्रमुख संतोष परब, राकेश तुळसुलकर, विजय उमळकर संचित ठाकूर, सागर जाधव, सिद्धेश धुरी,अभी मराठे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स