ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सिंधुदुर्गातून प्रथमतः आमदार वैभव नाईक आज उमेदवारी अर्ज करणार दाखल.

सिंधुदुर्गातून प्रथमतः आमदार वैभव नाईक आज उमेदवारी अर्ज करणार दाखल.

प्रकाशन: 24 Oct 2024 01:18 AM
वाचन संख्या 90

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्गातून प्रथमतः आज गुरुवार दि. २४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज सकाळी १० वाजता कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणावर त्यांची सभा होणार आहे. त्यानंतर ११.३० वाजता सभा स्थळ ते कुडाळ बाजारपेठेतील एसटी स्टॅंड कडून पोलीस स्टेशन मार्गे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणेकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स