कलाशिक्षक प्रकाश केसरकर यांना 'ज्योतिष वास्तूभूषण' पदवी.
मळगांव | नितिन गावडे : सावंतवाडी तालुक्यातील मळगांव इंग्लिश स्कूल मधील संगीत कलाशिक्षक श्री. प्रकाश वासुदेव केसरकर यांना पुण्यातील ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र यांच्याकडून वास्तू विशारद ,वास्तू भुषण व इयर ऑफ दी अचिवमेंट पदवी देऊन गौरवण्यात आले. ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे यांच्यावतीने २० ऑक्टोबर रोजी विणकर सभागृह येथे जोतिष वास्तू विश्व केंद्रातील विविध कोर्समध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींना पदवी प्रदान करण्यात आली.
वास्तू विशारद, वास्तू रत्न, वास्तू भूषण आणि लोलक विशारद, अंक विशारद यांसारख्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊन यशस्वीरित्या आपले वर्ग पूर्ण करून घेतल्या गेलेल्या, परीक्षेमध्ये सुयश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. श्री. प्रकाश केसरकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)