ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
जांभवडेतील शेकडो भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.

जांभवडेतील शेकडो भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.

प्रकाशन: 18 Oct 2024 10:02 PM
वाचन संख्या 118

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास.

कुडाळ |ब्यूरो न्यूज : आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील जाभंवडे गावामधील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.जाभंवडे गावचा विकास हा आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाला असून आमदार वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते जांभवडे गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आहे.यावेळी जांभवडे युवासेना शाखाप्रमुख पदी नागेश मडव,युवासेना उपशाखाप्रमुख पदी अंकीत मडव,युवासेना शाखाप्रमुख पदी अविनाश गोवेकर, युवासेना समन्वयक पदी ओमकार मडव, ओबीसी सेल उपविभागप्रमुख पदी महेश खोचरे, महिला शाखाप्रमुख पदी सारिका खोचरे यांची जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या शिफारसीनुसार आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देत अभिनंदन करून नेमणूक करण्यात आली.

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की सत्ता कोणाची असो विकासाची जबाबदारी मी आमदार म्हणून माझी आहे त्यामुळे या पुढील काळातही विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द आमदार वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना दिला आहे. यावेळी नागेश मडव, अंकित मडव, लक्ष्मण खोचरे,महेश खोचरे,अविनाश गोवेकर, नयन मडव, ओंकार मडव,यश मडव, सुधीर मडव, दयानंद मडव, तुकाराम खोचरे, जितेंद्र गोवेकर, मंदार गोवेकर, मिलिंद गोवेकर, प्रकाश गोवेकर, सुलोचना खोचरे, लीलावती खोचरे, दिपाली गोवेकर, प्रियंका गोवेकर, अनिता गोवेकर, सारिका खोचरे, अशोक पारकर, अर्चना पारकर, संदीप पेडणेकर, पार्वती गोवेकर, वैशाली गोवेकर, निर्मला गोवेकर, शंकर पेडणेकर, दिनेश साताडेकर, रंजना खोचरे या भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

याप्रसंगी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे कणकवली विधानसभाप्रमुख सतिश सावंत, कुडाळ उपतालुकाप्रमुख सचिन कदम, महेश सावंत, आबा मुंज, घोटगे शाखाप्रमुख चंदन ढवळ, जांभवडे शाखाप्रमुख तेजस भोगले, हर्षद ढवळ, सिध्देश सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स