आमदार नितेश राणेंची नूतन बांधकाम सभापती विराज भोसले यांनी घेतली सदिच्छा भेट.
कणकवली | उमेश परब : कणकवली नगरपंचायत चे नवनिर्वाचित बांधकाम सभापती ऍड. विराज भोसले यांनी त्यांचे वडिल व प्रतिष्ठित बांधकाम व्यवसायीक सुभाष भोसले, बंधू अभिजित भोसले यांच्यासह आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त करत आशीर्वाद घेतले. 21 ऑक्टोबर रोजी झालेल्या विषय समिती सभापती निवडीत ऍड. विराज भोसले यांची नगरपंचायत च्या महत्वाच्या बांधकाम सभापतीपदी निवड करण्यात आली. आमदार नितेश राणे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली. नगरसेवकपदाच्या पहिल्याच टर्म मध्ये ऍड. विराज भोसले याना दुसऱ्यांदा विषय समिती सभापती होण्याचा मान राणे कुटुंबियांमुळे लाभला आहे. यापूर्वी ऍड. विराज भोसले यांनी कणकवली नगरपंचायतच्या आरोग्य सभापतिपदी यशस्वी कारभार सांभाळला आहे. कणकवली नगरपंचायत च्या विषय समिती सभापती निवडीनंतर आज प्रथमच आमदार नितेश राणे यांचे कणकवलीत आगमन झाले. प्रहार भवनमध्ये आमदार नितेश राणेंची सदिच्छा भेट घेत ऍड. विराज भोसले यांनी कृतज्ञता व्यक्त करत आशीर्वाद घेतले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)