ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
खोटारड्या ठाकरे सरकार मुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी....!

खोटारड्या ठाकरे सरकार मुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी....!

प्रकाशन: 23 Oct 2021 02:47 PM
वाचन संख्या 95

आमदार नितेश राणे कडाडले…..!

फसव्या घोषणा करण्यात सरकार व्यस्त; शेतकरी झाला उध्वस्त

कणकवली | उमेश परब : ठाकरे सरकार आल्यापासूनच राज्यातील शेतकरी अंधारात आहे. शेतकऱ्याला अडगळीत टाकण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळे अनेक संकटे राज्यावर आली. आज राज्यातील शेतकऱ्याला ही दिवाळी अंधारात साजरी करावी लागणार आहे. खोटारड्या ठाकरे सरकार मुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी असणार आहे अशी टीका आमदार नितेश राणे यांनीं केली.
कणकवली येथील प्रहार भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहर अध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर आरोप करत हे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री पदावर बसल्यापासून वादळ, पाऊस कोरोनात तर राज्य सर्वच ठिकाणी आघाडीवर होते. हा मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे. अनेक संकटे बळीराजावर आली संकट काळी ठाकरे सरकारने केवळ स्टंट बाजी केली आहे. बांधावर जाऊन फक्त मोठं मोठ्या वलग्ना केल्या. गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांना काय दिले ते दाखवावे….! मागील दोन वादळात शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती ती अद्याप मिळालेली नाही. पंचनामे किती केले याचा अंदाजच नाही. शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची घोषणा म्हणजे ,”क्या हुआ तेरा वादा” असेच म्हणावं लागेल. ठाकरे सरकार आल्या नंतर एक रुपया मिळाला नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खावटी कर्जाची घोषणा यांचे नेते करता आहेत.
शेतकऱ्याला एक साधी दमडी मिळत नाही प्रोत्साहन निधी म्हणून जाहीर केलेले ५० हजार मिळाले नाहीत व यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करताना खूप अडचणी येमार आहेत. काळी दिवाळी करण्याचे पाप ठाकरे सरकार वर लागणार आहे. भ्रष्टाचार, वसुली, धाडी यामध्येच हे लोक व्यस्त आहेस. चपट्या पायाच्या सरकारने शेतकऱ्यांना काळी दिवाळी करण्यास प्रवृत्त केले आहे. ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या मोठ्या लोकांच्या बाबतीत धावपळ करणारे ठाकरे सरकार शेतकऱ्यांच्या मुलांबद्धल निर्णय कधी घेणार. ही काळी दिवाळी करण्यासाठी प्रवृत्त केलेल्या सरकार चा भाजपाच्या वतिने आम्ही निषेध करतो. राज्यातील शेतकऱ्यांना काळी दिवाळी करण्यासाठी मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ जबाबदार असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केली. वारंवार हिंदू सण परंपरा यावर बंदी आणणारे हे सरकार म्हणजे थापडे सरकार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स