ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
उद्योजक तथा युवानेते विशाल परब यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण.

उद्योजक तथा युवानेते विशाल परब यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण.

प्रकाशन: 16 Oct 2024 02:15 PM
वाचन संख्या 125

बांदा | राकेश परब : उद्योजक तथा युवानेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून बांदा येथील जनतेच्या सुविधेसाठी रुग्णवाहिकेचे विशाल परब यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासनाला फवारणी मशीन व कचराकुंड्या सुद्धा वितरीत करण्यात आल्या.

या कार्यक्रमाच्या वेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रेता कोरगांवकर, ॲड अनिल निरवडेकर, बांदा उपसरपंच बाळू सावंत, माजी पंचायत समिती सभापती शितल राऊळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, तनुजा वराडकर, श्रेया केसरकर, देवल येडवे, दीपलक्ष्मी सावंत, रेश्मा सावंत, श्याम मांजरेकर, माजी सरपंच अक्रम खान, बाळा आकेरकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, शुभम साळगावकर, अक्षय परब, सिद्धेश पावसकर, अक्षय मयेकर, शैलेश केसरकर,
राकेश केसरकर, सागर सावंत, सिद्धेश महाजन, सुनील राऊळ, उदय येडवे, सुनील धामापूरकर, दिलीप भालेकर, गुरुदास कल्याणकर, निलेश कदम, समीर कल्याणकर, अमोल सावंत, निलेश देसाई, सुधीर शिरसाट आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी विशाल परब म्हणाले, उद्योगपती रतन टाटा यांच्या
निधनामुळे मी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला
आहे. आपण नेता नसून सर्व सामान्य कार्यकर्ता आहे.
जेव्हा आपल्या काही अडचण आल्यास मला हाक द्या मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन अशी ग्वाही त्यांनी बांदावासीयांना दिली. स्वर्गीय रतन टाटा यांच्या निधनाने भारत देशात पंधरा दिवस दुःखवटा असल्याने आपला वाढदिवस आपण साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स