ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानचा दसरोत्सव पारंपारिक उत्साहात.

साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानचा दसरोत्सव पारंपारिक उत्साहात.

प्रकाशन: 14 Oct 2024 01:54 AM
वाचन संख्या 214

शिरगांव | संतोष साळसकर : ऐतिहासिक वारसा असलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री.देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानाचा दसरोत्सव शनिवारी शाही थाटात, भाविकांच्या अलोट गर्दीत पारंपारिक उत्साहात साजरा करण्यात आला. श्री पावणाई देवालयात ढोल-ताशा वाजवून इशारत करण्यात आली. यावेळी बारा – पाच मानकरी, ग्रामस्थ, देवसेवक व भक्तगण मंदिरात जमा झाल्यानंतर वस्त्राभूषणांनी सजविलेले देवतरंग ( शिवकळा) काढण्यात आल्याव शिवकळेकडून सिमोल्लंघनाचा हुकूम घेण्यात आला. ढोल – ताशाच्या गजरात, फटक्याच्या आतषबाजीत, हर हर महादेवच्या घोषात देव तरंगाबरोबर निशाणदार, भालदार, चोपदार, मशालदार, चौरवीदार, अबदागीर, घडशी, गोंधळी, देवाचे सेवेकरी अशा लवाजम्यासह बारा – पाच मानकरी, ग्रामस्थ, असंख्य भक्तगण सिमोल्लंघनासाठी आपट्याच्या झाडाकडे गेले. या मंदिरापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर आपट्याचे झाड आहे. तिथे गेल्यावर त्या आपट्याच्या झाडाची ब्राह्मणाकरवी पुजा करण्यात आली. आपट्याच्या झाडाची पाने ( सोने) म्हणून लुटण्यात आली. त्यानंतर ही देवता परत येताना चौ-याऐंशीच्या चाळ्याला भेट देऊन नंतर रिवाजाप्रमाणे श्री गांगेश्वर – विठ्ठलाई देवीला भेटली. त्यानंतर श्री देव सिद्धेश्वर, श्री देवी पावणाई व श्री रवळनाथ देवालयाभोवती फेरी मारून त्या देवतांची भेट झाली. त्या नंतर देवता पापडीवर गेल्यावर भक्तानी देवास सोने अर्पण करून कृपाशिर्वाद घेतले.

या सोहळ्याला भाविकांची प्रचंड गर्दी होती. देवीची ओटी भरण्यासाठी व देवदर्शनासाठी माहेरवाशीणी आल्या तर चाकरमानींचीही उपस्थिती होती. शिरगांव दशक्रोशीतील असंख्य भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेला होता.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स