ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालोंड बेलाची वाडी येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पाच विकासात्मक कामांचे भूमिपूजन.

मालोंड बेलाची वाडी येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पाच विकासात्मक कामांचे भूमिपूजन.

प्रकाशन: 14 Oct 2024 02:42 AM
वाचन संख्या 84

खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नामुळे निधी उपलब्ध.

मसुरे | प्रतिनिधी : मालोंड वाडी येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विविध विकासात्मक पाच कामांचे भूमिपूजन रविवारी सकाळी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यामध्ये
मालोंड वाडी श्री देव नारायण मंदिर ते मुख्य रस्ता बंदिस्त गटार बांधणे – निधी तीन लाख रुपये पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्या मुळे मालोंड पूर्ण प्राथमिक शाळा दुरुस्ती करणे – निधी चार लाख रुपये, माजी खासदार श्री. निलेश राणे यांच्या शिफारशीने, मालोंड अंगणवाडी दुरुस्ती करणे निधी दोन लाख ५०हजार रुपये, माजी खासदार श्री. निलेश राणे यांच्या शिफारशीने, मालोंड टेंबवाडी ते विठ्ठल मंदिर रस्ता डांबरीकरण करणे – निधी पाच लाख रुपये, खासदार श्री. नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीने, मालोंड स्मशानभूमीत स्मशान शेड बांधणे – निधी पाच लाख रुपये खासदार माननीय श्री नारायणराव राणे, माजी खासदार निलेश राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीने निधी मंजूर झाला आहे.

ही कामे होण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे येथील बूथ प्रमुख जितेंद्र परब, माजी उपसभापती छोटू ठाकूर, माजी सभापती अनिल कांदळकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. तसेच या विकासात्मक कामांना भारतीय जनता पक्षाचे नेते दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, महेश मांजरेकर यांचे सहकार्य लाभले.

या वेळी सरपंच श्रीमती पूर्वी फणसगावकर, उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, माजी उपसभापती संजय ठाकूर, बुथ अध्यक्ष जितेंद्र परब, माजी उपसरपंच नाना परब, रवींद्र घाडीगावकर ,सुभाष घाडीगावकर , कृष्णा मिस्त्री, दिगंबर आचरेकर, श्रीकांत मालोडकर, संतोष घाडीगावकर, रामचंद्र देवळी, अनुष्का परब( ग्रामपंचायत सदस्य), विवेकानंद घाडीगावकर, मधुकर घाडीगावकर, प्रशांत घाडीगावकर, दिलीप घाडीगावकर, आबा घाडीगावकर, आबा घाडीगावकर, बाबा तांडेल, पद्माकर फणसगावकर, बंटी परब गोविंद परब संदीप परब ,विश्वनाथ परब निलेश मसुरकर, दिपाली घाडीगावकर ,सरिता परब, बाळा पारकर, दिलीप परब ,मकरंद कुंटे रघुवीर जांभेकर , रमेश परब रामचंद्र घाडीगावकर, संतोष देवळी, विनय परब, बाबा मेस्त्री, विनय मेस्त्री, बाळा सुभेदार आबा आचरेकर, विनोद परब, तसेच सर्व शिक्षक व सर्व टेंबवाडी ग्रामस्थ, मालोंड, वाडी ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स