ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
महाविकास आघाडीच्या वतीने 'ढोल बजाओ, आरोग्य यंत्रणा' सुधारो आंदोलन.

महाविकास आघाडीच्या वतीने 'ढोल बजाओ, आरोग्य यंत्रणा' सुधारो आंदोलन.

प्रकाशन: 13 Oct 2024 10:28 PM
वाचन संख्या 184

महाविकास आघाडीच्या वतीने ‘ढोल बजाओ, आरोग्य यंत्रणा’ सुधारो आंदोलन.

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ओरोस शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रवेशद्वारावर आंदोलन.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ‘आला पेशंट की पाठवा गोव्याला’ अशी काहीशी दुरावस्था सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजची झालेली आहे. कोणताही पेशंट आला की गोव्याला पाठविण्याच्या पलीकडे कोणतेही काम शासकीय मेडिकल कॉलेज करत नाही. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिंदे – फडणवीस सरकारकडून भोंगळ कारभार सुरु आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी हे महाविद्यालय मंजूर केल्यानंतर गेल्या तीन वर्षात शिंदे – फडणवीस सरकारने शिक्षक भरती केलेली नाही,नवीन इमारतीच्या कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या वर्गखोल्या नाहीत,वसतीगृहाची व्यवस्था केलेली नाही,अपुरे कर्मचारी वर्ग,अपुरा औषधपुरवठा, सिटीस्कॅन मशीन बंद,शस्त्रक्रिया होत नाहीत त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय बंद पाडण्याचा शिंदे – फडणवीस सरकारचा प्रयत्न असून याविरोधात आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने उद्या सोमवार दि.१४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रवेशद्वारावर ओरोस येथे ‘ढोल बजाओ आरोग्य यंत्रणा सुधारो’ आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली असून जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स