रसिका पाटील पैठणीच्या मानकरी.
मसुरे | प्रतिनिधी : श्री. नवदुर्गा कला क्रीडा मंडळ आयोजित आणि श्री. अनिल कांदळकर व श्री. राकेश परब प्रायोजित खेळ पैठणीचा या स्पर्धेत सौ. रसिका प्रमोद पाटील या पैठणीच्या मानकरी ठरल्या. द्वितीय क्रमांक सौ. प्रतीक्षा हळदणकर, तृतीय क्रमांक सौ शैलजा नरसाळे यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेत ३१ स्पर्धेकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे सूत्रसंचालन कुडाळ येथील राकेश हळदणकर यांनी तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)