ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
वराड येथील प. पू. श्री राणे महाराज मठ येथे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून भक्त निवास आणि हॉलची उभारणी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वराड येथील प. पू. श्री राणे महाराज मठ येथे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून भक्त निवास आणि हॉलची उभारणी.

प्रकाशन: 09 Oct 2024 05:18 AM
वाचन संख्या 95

मालवण | प्रतिनिधी : आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत प. पू. श्री राणे महाराज मठ कुसरवे – वराड येथे भक्त निवास आणि हॉलचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी रुपये मंजूर केले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून हा निधी मंजूर केला होता. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सोमवारी या कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

कुसरवे – वराड येथील प. पू. श्री राणे महाराज मठ हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. अनेक भाविक भक्तांगण याठिकाणी भेट देऊन दर्शन घेतात. भाविक भक्तांच्या सोयीसाठी आ.वैभव नाईक यांनी याठिकाणी भक्त निवास आणि हॉलसाठी १ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. सुसज्ज असे भक्तनिवास व हॉल याठिकाणी उभारला जाणार आहे. त्याबद्दल ट्रस्ट व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. यावेळी मुरलीधर गोवेकर, नित्यानंद म्हाडगुत ,कुडाळ काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळा महाभोज, आबा कोटकर, प्रकाश चोणकर, अवि नेरकर, गणेश वाईरकर, राजू सावंत, दाजी हडकर, संजय चव्हाण, आशिष परब, आप्पा परुळेकर , पेंडूर विभाग प्रमुख शिवा भोजने, वंदेश ढोलम, दर्शन म्हाडगुत, बाबू टेंबुलकर, निलेश हडकर , हर्षल मोरजकर, दिलीप आचरेकर, सतीश चव्हाण, दुर्गानंद गावठे, सत्यवान चव्हाण, अरुण गावडे, रुपेश आमडोसकर, महेश परब, किरण रावले, अनंत चव्हाण, शिशुपाल राणे, संजना चव्हाण, शुभदा चव्हाण, योगिता वेंगुर्लेकर, स्वप्नील आपटे आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स