ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आंबोली घाटाच्या पायथ्याशी पारपोली गांवात फुलपाखरु महोत्सव.

आंबोली घाटाच्या पायथ्याशी पारपोली गांवात फुलपाखरु महोत्सव.

प्रकाशन: 30 Sep 2024 12:38 PM
वाचन संख्या 151

सावंतवाडी | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आंबोली घाट पायथ्याशी फुलपाखरांचे गांव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारपोली गावात शुक्रवार ४ ऑक्टोबर पासून दुसऱ्या फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यापर्यंत चालणारा हा महोत्सव सिंधू रत्न समृद्ध योजनेतून आणि पारपोली संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत असून निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. शुक्रवारी सकाळी ९:३० वाजता होणाऱ्या या फुलपाखरू महोत्सवाच्या उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.पारपोली गावात फुलपाखरांच्या वाढीसाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सूक्ष्म असे वातावरण असुन फुलपाखरांचे अन्न असलेली विविध प्रकारची फुले उपलब्धतेचे वरदान आहेत. त्यामुळे सुमारे १८० प्रकारची विविध फुलपाखरे या गावात आढळतात.

फुलपाखरांच्या जैवविविधतेने नटलेले पारपोली गांव फुलपाखरांच्या प्रजातीचे माहेरघर आहे. या गावात अतिशय दुर्मिळ आणि केवळ पश्चिम घाटात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती यातील फुलपाखरांच्या बहुसंख्य जाती ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये या गावात आढळून येतात. मलबार, बँडेड पिकॉक, सर्दन बर्ड विंग, मलबार ट्री निंफ, मलबार रेवेन, मलबार स्पॉटेड प्लॅट अशा विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या जीवन चक्राचा अभ्यास करण्यासाठी निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी हे विशेष आहे. या महोत्सवात पारपोली ते आंबोली घाट या भ्रमंतीत जंगल व दरी खोऱ्यातील विविध दुर्मिळ वन्यजीवांची माहिती, उंच कड्यावरून कोसळणारे दुधाळ धबधबेही अनुभवता येणार आहे. यावेळी फुलपाखरू तज्ञ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली जंगलातील फुलपाखरांच्या माहितीसह त्यांचा जीवनक्रम व त्याबाबतचे ज्ञान व विज्ञान आणि तांत्रिक माहिती पर्यटकाना देण्यातयेणार आहे. तसेच आंबोली धबधबा, महादेव गड पॉईंट, कावळेसात पॉईंट, हिरण्यकेशी उगमस्थान, फुलपाखरू वन उद्यान याचाही आस्वाद घेता येणार आहे.तसेच या महोत्सवात पारपोली गावातील पारंपारिक घरात राहण्यासह पारंपारिक खाद्य संस्कृतीचा आणि विविध पारंपारिक कला याचा आस्वाद घेण्याची संधी देखील पर्यटकांना मिळणार आहे.

निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी चार महिने हा महोत्सव होणार असून गेल्या वर्षी या महोत्सवासाठी समाधानकारक नोंदणी झाल्यामुळे देशभरातील पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या फुलपाखरू महोत्सवासाठी राज्याचे शालेय शिक्षण व भाषामंत्री दीपक केसरकर यांनीच पुढाकार घेतला त्यांच्या संकल्पनेतूनच हा महोत्सव होत आहे. या महोत्सवासाठी त्यांनी सिंधू रत्न योजनेतून निधी उपलब्ध करून दिला आहे. या फुलपाखरांच्या गावाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून अभिनेते दिगंबर नाईक यांची निवड करण्यात आली होती. राज्यातील पहिले फुलपाखराचे गाव म्हणून पारपोली गाव घोषित करण्यात आले. आता या महोत्सवातून या गावाला फुलपाखरांचे गाव म्हणून मान्यता मिळाली आहे. गेल्या वर्षी या महोत्सवासाठी होम स्टे सुविधांसह तसेच विविध प्रकारचे स्टॉल मांडण्यात आले होते

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स