ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
जि.प. अध्यक्ष सौ.संजना सावंत यांचे मिशन युवा स्वास्थ्यसाठी विशेष आवाहन....!

जि.प. अध्यक्ष सौ.संजना सावंत यांचे मिशन युवा स्वास्थ्यसाठी विशेष आवाहन....!

प्रकाशन: 22 Oct 2021 05:35 PM
वाचन संख्या 52

अठरा वर्षांवरील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी विशेष लसिकरण सत्र आयोजित करायचीही घोषणा ..!

ओरोस | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जि.प.अध्यक्ष सौ.संजना सावंत यांच्या विशेष देखरेखीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे कोविड प्रतिबंधात्मक उपक्रम नियमीत सुरु आहेत. त्या अंतर्गत  मिशन युवा स्वास्थ covid-19 लसीकरण अंतर्गत दिनांक 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत 18 वर्षावरील सर्व विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण महाविद्यालय स्तरावर जिल्हा परिषद सिंधुदुर्ग माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. सदर मोहिमेअंतर्गत 18 वर्षावरील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष लसीकरण सत्र आयोजित करून लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. तरी सर्व 18 वर्षावरील विद्यार्थ्यांनी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील जि.प.अध्यक्ष सौ.संजना सावंत यांनी केले आहे.
लसीकरणात पात्र लाभार्थ्यांची यादी शालेय शिक्षण व उच्च व तंत्रशिक्षण विभागाने संबंधित तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडे सोपवण्यात बाबत अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संजना सावंत यांनी सूचना दिल्या आहेत. आरोग्य विभागाने लसीकरण सत्रा साठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील जि.प. अध्यक्ष सौ.संजना सावंत यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व सर्व आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. तरी सर्व 18 वर्षावरील विद्यार्थ्यांनी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील जि.प.अध्यक्ष सौ संजना सावंत यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स