ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
कोकण रेल्वेचे स्टेट बॅंक ऑफ इंडियाशी कराराने  योनो मर्चंट अ‍ॅप केले लाँच..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कोकण रेल्वेचे स्टेट बॅंक ऑफ इंडियाशी कराराने योनो मर्चंट अ‍ॅप केले लाँच..!

प्रकाशन: 23 Oct 2021 02:07 AM
वाचन संख्या 59

ब्युरो न्यूज | विवेक परब : कोकण रेल्वेतून विनातिकिट प्रवास करणाऱ्यांकडील दंड किंवा तिकिटांची रक्कम भरण्यासाठी ऑनलाईन पेमेंटचा पर्याय राबविला जात आहे. : साठी योनो मर्चंट कोकण रेल्वेने लाँच केले आहे. त्याचा फायदा रोख रक्कम न बाळगणाऱ्या अनेक प्रवाशांना होणार आहे.कोकण रेल्वेने विविध सेवांमध्ये डिजिटल पद्धतीचा वापर करण्यास सुरवात केली आहे. केआरसीएलने रेल्वे तिकीट निरीक्षकांनी (टीसी) गोळा केलेली रक्कम रोख स्वरूपात न घेता ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाशी करार केला आहे. त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योनो मर्चंट अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे. हे अँड्रॉइड आधारित अ‍ॅप असून, रेल्वेमधील टीसींच्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. प्रवाशांकडून तिकिटासाठी अतिरिक्त भाड्याची रोख रक्कम गोळा करण्याऐवजी अ‍ॅपमध्ये तयार केलेल्या कोडद्वारे डिजिटल पेमेंट स्वीकारण्यात येणार आहे. प्रवाशांना क्यूआर कोड स्कॅन करण्याची आणि भीम, पेटीएम, गुगल पे, फोन पे आदी कोणत्याही डिजिटल पद्धतीद्वारे पेमेंट करण्याची व्यवस्था अ‍ॅपमध्ये असेल. या प्रयोगामुळे रेल्वे तिकीट परीक्षकांद्वारे रोख हाताळणी टाळता येणार आहे. हा प्रयोग कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये केला जाणार आहे. २० ऑक्टोबरला रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमात कोकण रेल्वेचे संचालक (वित्त) राजेश भडंग, एल के वर्मा मॅथ्यू फिलिप यांच्या उपस्थितीत अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. यावेळी प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये, स्टेट बँकेचे अधिकारी स्वपन घोष, अमित राज, सतीश नाईक आदी उपस्थित होते.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स